आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Wait For Government Help Issue At Akola, Divya Marathi

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकरी सानुग्रह मदतीच्या प्रतीक्षेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गारपीटग्रस्तांना नुकसानाचा मोबदला तीन दिवसांत देण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त डी. आर. बनसोड यांनी दिले आहे. मात्र, 12 ते 14 एप्रिल असे सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्याने त्यांनी दिलेल्या आदेशावर कार्यवाही होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गारपिटीच्या सानुग्रह मदतीसाठी शेतकर्‍यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

28 फेब्रुवारी ते 16 मार्चदरम्यान झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे शेतातील पिके जमीनदोस्त झाली. पावसासह गारांमुळे जनावरांनाही इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 23 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, मदतीसाठी त्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, या विवंचनेने ते ग्रासले आहेत. जिल्ह्यातील गारपिटीची नुकसान भरपाई अद्यापही जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पदरी पडली नाही. जिल्ह्यात 23 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय महसूल आयुक्तांना पाठवला आहे. त्यानंतर शासनाकडून जिल्ह्यासाठी 21 कोटी रुपयेसुद्धा प्राप्त झाले आहेत. मात्र, हे अनुदान प्राप्त होऊनही लोकसभा निवडणुकीमुळे मदत वाटपात दिरंगाई झाल्याचे दिसते.

मदतीचे करणार लवकर वाटप
जिल्ह्याकील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठीचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. त्याचे संबधितांना लवकरच वाटप करण्यात येणार आहे.’’ संदीप साबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अकोला.

दृष्टिक्षेपात नुकसान
तालुका गावे नुकसान हेक्टरमध्ये
अकोला 32 2,011
बार्शिटाकळी 57 2,124
मूर्तिजापूर 164 10,940
अकोट 1 6.30
तेल्हारा 31 4,047
बाळापूर 42 3,230
पातूर 12 2,062
एकूण 33 923,620