आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

60 हजार हेक्टरवरील पेरण्या आल्या धोक्यात; मृग नक्षत्राने दिला दगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मृग नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील 60 हजार हेक्टरवरील झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहे. दरम्यान, अजूनही पावसाऐवजी रखरखते ऊन तापत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, झालेल्या पेरण्या नष्ट होण्याची शक्यता अधिक असल्याने अशा शेतकर्‍या ना शासनाने मोफत बियाणे देण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

मृग नक्षत्रात पाऊस बरसेल व 10 जूननंतर मान्सूनचे आगमन होईल, या वेधशाळेच्या बातम्यांवर विश्वास ठेवून यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 60 हजार हेक्टरवर शेतकर्‍या नी पेरणी केली आहे. 17 जून रोजी पाऊस पडल्याने हजारो शेतकर्‍या नी पेरणी केली. टोबलेले बियाणे अंकुरले, परंतु त्यानंतर पाऊसच झाला नाही. आता मात्र रखरखते ऊन तापत असल्याने पेरणी धोक्यात आली आहे. मागील तीन दिवसांत पडलेले भयंकर ऊन्ह व अधिक तापमान त्यामुळे आता प्रचंड उकाड्याने अंकुर कोमजत आहेत.

बियाणे देण्याची मागणी
महाराष्ट्रात सरासरी 3७ मिलिमीटर पाऊस बरसताच शेतकर्‍या नी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला. गत आठ दिवसांत 30 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 20 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीच्या लागवडीचे आहे, तर ८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. दोन लाख हेक्टरवर इतर लागवड करण्यात आली. यामध्ये तूर, ज्वारी आणि मूग, उडदाच्या क्षेत्राचा समावेश आहे, मात्र आता पेरणीनंतर पाऊस नसल्याने पेरणी करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या 20 लाख हेक्टरवरील कोरडवाहू क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट अटळ असून, सरकारने शेतकर्‍या ना आता बियाणे वाटप करावे व नव्याने कर्ज द्यायला हवे, अशी मागणी सोमवारी 23 जून रोजी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
शेतकर्‍याचे डोळे लागले आकाशाकडे
मागील दोन वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडल्या गेलेल्या शेतकर्‍या समोर यावर्षीही पावसाअभावी पुन्हा नवे संकट उभे राहीले आहे. एरवी 20 जूनपर्यंत खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. मात्र यावर्षी पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. हवामान खात्यानेही यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे शेतकर्‍याच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. आज पाऊस येईल, उद्या येईल या आशेवर शेतकरी एक-एक दिवस पुढे ढकलत आहेत. काही गावात धोंडी मागून वरूणराजाला साकडे घालण्यात येत आहे.
दुबार पेरणीचे संकट
बाजारात बियाणे नाहीत. महागडे बियाणे पेरूनही मृग संपला तरी पाऊस कोसळला नाही. त्यामुळे बियाणे करपले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत . मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर शेतकर्‍या नी धूळ पेरणी केली. रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोबण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरद्वारे ओलीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारनियमनाने ओलीतही पुरेपूर करता आले नाही, अशा स्थितीत महागडे बियाणे उद्ध्वस्त झाले आहे. जिल्ह्यात 17 जूनला पडलेल्या पावसानंतर हजारो शेतकर्‍या नी पेरणी केली. या सर्व पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
पावसाची गरज
४जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 60 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्या जमिनीत ओल असेल त्या ठिकाणी आणखी दोन-तीन दिवस पाऊस आला नाही तरी चालेल. मात्र, हलक्या दर्जाची, उतारातील जमीन असेल तर तेथील पिकांना मात्र धोका निर्माण झाला आहे. पाण्याची व्यवस्था असणार्‍या नी ओलीत करणे गरजेचे आहे. ’’
- दत्तात्रय गायकवाड, कृषी अधीक्षक, यवतमाळ