आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- शेतात पाणी घुसल्याने अन्वी मिर्झापूर येथील तीन शेतकर्यांनी 31 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच 1 सप्टेंबर रोजी एका महिला शेतमजुराने अंगावर रॉकेल घेतले. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. शेतातील पिके नष्ट करणार्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी या महिलेने हे पाऊल उचलले. मनकर्णा कचरूपवार (वय 55, रा. महान (बिहाडमाथा) हे या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर कारवाई केली.
पार्श्वभूमी घटनेची
मनकर्णा पवार या भूमीहीन आहेत. त्यांचे कुटुंबीय 15 वर्षांपासून डउचका येथील गट क्रमांक 1मधील 6 एकर शेती वाहत आहेत. 30 जुलैला नानोटे कुटुंबातील सात जणांनी शेतात जनावरे घुसून पिके नष्ट केली, असा आरोप पवार यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केला. आमच्या शेतावर मजुरीसाठी का येत नाही, असे म्हणत त्यांनी मारहाण केल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पवार यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून गुलाब जुंजाराम नानोटे, राजू नानोटे, अतुल नानोटे, बाळू नानोटे, विनोद नानोटे, नीळकंठ नानोटे यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही केली. कारवाई न झाल्यास त्यांनी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. मनकर्णा पवार मुलासोबत एमएच-30-पी-7884 या क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली. मुख्यद्वारातून ऑटोरिक्षाने कार्यालय परिसरात प्रवेश केला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी ऑटोरिक्षाचा पाठलाग केला. ऑटोतून उतरताच मनकर्णा यांनी बॉटलमधून अंगावर रॉकेल घेण्यास सुरुवात केली. तेवढय़ात महिला पोलिस कर्मचारी पुष्पा रायबोले आणि कुसुम राठोड यांनी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे या पोलिस कर्मचार्यांच्या अंगावरही रॉकेल पडले. या वेळी उपनिरीक्षक ए. डी. डोईफोडे, कॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, अमित दुबे, राजेंद्र तेलगोटे, अमोल बहाद्दूरकर, राधेश्याम पटेल बंदोबस्तासाठी तैनात होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.