आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज पुनर्गठन; "तारीख पे तारीख'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पीक कर्ज पुनर्गठनासाठी बँकांकडून शेतक-यांना तारीख पे तारीख मिळत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. एकीकडे शासनाने मुदतवाढ देऊनही बँकेचे अधिकारी शेतकंना आमच्यापर्यंत आदेशच पोहोचले नसल्याचे सांगत आहेत. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या प्रकाराची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.

शेतक-यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचे आदेश जिल्ह्यात घुसर येथे भेटीदरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दीड महिन्यानंतरही आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. संपूर्ण जून महिन्यात नव्याने पीक कर्ज पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. आतापर्यंत केवळ १४.८० टक्के उद्दिष्ट बँकांनी सामूहिकरीत्या गाठले आहे. ११ लाख हजार ५५९ प्रकरणे बँकांमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १७ हजार ४२७ प्रकरणे निकाली लागली आहेत. जिल्ह्यातील ७० हून अधिक बँकांनी ८० कोटी १७ लाख रुपये वितरित केले आहेत. अजूनही हजारो शेतक- याचे प्रस्ताव बँकांमध्ये प्रलंबित आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

... तर बँकांवर कारवाई करू
^जिल्ह्यातील शेतक-यांना पीक कर्ज देण्याच्या सूचना बँक अधिकांना करण्यात आल्या आहेत. शेतकंना सहकार्य करण्याचे बँकांना सांगण्यात आले आहे. शेतकंना पीक कर्ज देणा बँकांवर कारवाई करू.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी

तुमच्याकडे आहेत का आदेश
कुरणखेडयेथील एका बँकेत पीक कर्ज पुनर्गठनासाठी गेलो असता शाखाधिकारी व्यवस्थित बोलला पण नाही. आमच्याकडे पुनर्गठनाचे कोणतेही आदेश नाहीत. तुमच्याकडे असतील तर द्या, असे म्हणत पुनर्गठनाबाबत नकार दिला.'' रामदासवाकोडे, शेतकरी,पैलपाडा

दुबार पेरणीचे संकट
पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे पिकांवर परिणाम झालेला दिसून येतो. पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावत आहे. आधीच कर्जबाजारी शेत-याकला किमान कर्ज तरी पुरवावे, अशी मागणी शेतकंमधून होत आहे.