आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी कर्ज वाटपात १६७ कोटींची वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कृषीकर्ज वाटपात १६७ कोटी ७८ लाख रुपयांची वाढ जिल्हा वार्षिक पत आराखड्यात करण्यात आली आहे. याचा निश्चितच बहुसंख्य शेतकर्‍यांना लाभ होईल, अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकोला, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी दिली.

विविध क्षेत्रातील विकासकामासाठी सर्वच बँकांना कर्ज वाटपाचे ध्येय पत आराखड्यानुसार देण्यात येते. सन २०१५-१६ च्या वार्षिक पत आराखड्यामध्ये प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील कर्ज वाटपाला प्राधान्य दिले आहे. बँका वर्षभर विविध क्षेत्रात कर्जपुरवठा करत असतात. वर्ष २०१५-२०१६ च्या जिल्हा वार्षिक पत आराखड्याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही समाधान व्यक्त केले आहे. आराखड्यानुसार कृषी सहायक क्षेत्रासाठी १६ टक्के, तर पीक कर्ज २२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सरकारी योजनांसाठी यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

गरजू शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : कृषीकर्ज योजना कोरडवाहू बागायती दोन्ही शेतकर्‍यांसाठी उपलब्ध आहे. कृषी कर्जाच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी गरजू शेतकर्‍यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुकाराम गायकवाड यांनी केले आहे.

शेतकरी आत्महत्या रोखणार
बँकाचे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महसूल, कृषी जिल्हा परिषदेच्या मदतीने ग्रामीण भागातील गरजू शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून कृषी कर्ज देऊन त्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा प्रयत्न बँकांचा असणार आहे. यासाठी अग्रणी बँकेच्या नियंत्रणात सेंट्रलाइज बँकासोबत इतरही सहकारी बँका या अभियानात सहभागी होणार आहेत.

तक्रारीसाठी संपर्क
पीक कर्जासाठी अथवा कृषी कर्ज देण्यास अधिकार्‍याने त्रास विलंब केला, तर संपर्क करा. न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.'' - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बँक.