आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंजर - बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरातील शेतकऱ्यांनी १५ जूनपासून खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली असून, वरुणराजाच्या कृपेमुळे २२ जूनपर्यंत येथील पेरणी पूर्णत्वास येत आहे. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पेरलेले बियाणे उगवते की नाही, याचीही चिंता शेतक-यांना लागली आहे.

पिंजर परिसरातील भेंडीमहल, भेंडगाव, खेर्डाभागाई, महागाव, बहिरखेड, निहिदा, भेंडीकाशी, मोझारी, खेर्डा खुर्द या गावांमध्ये ७० टक्के पेरणी आटोपली आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज घेत बँकेच्या मदतीवर अवलंबून राहता बळीराजाने जमेल तसे जुगाड लावून एकदाची पेरणी उरकल्याचे चित्र असून, आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत. मागील चार दिवसांपासून पाऊस झाल्याने उगवलेली रोपटे माना टाकत आहेत, तर उशिरा पेरणी केलेले शेतकरीसुद्धा चिंताग्रस्त झाले आहेत.

दरम्यान, ज्या बागायती शेतक-यांनी पेरणी केलेल्या कपाशीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची झाडे वाळत आहेत. या प्रकाराबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.


कपाशी गेली वाया
मे महिन्यातच कपाशीची लागवड केली. मागील वर्षी समाधानकारक उत्पादन मिळाले. मात्र, यंदा कपाशीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने २५ टक्के कपाशी वाया गेली आहे.'' भारतआप्पापेद्ये, शेतकरी, पिंजर
पुढील स्लाईड वर पाहा बार्शिटाकळी परिसरात बागायती पिकांच्या मशागतीला वेग
बातम्या आणखी आहेत...