आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेध मान्सूनचे: पेरणीपूर्व कामे झालीत पूर्ण; आता प्रतीक्षा केवळ पावसाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जून महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही तापमान ४० अंशांच्या खाली आले नाही. अशा कडक उन्हात जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांची खरीपपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत, तर काहींची अंतिम टप्प्यात आहेत. आजवरचा टंचाईचा अनुभव पाहता अनेक शेतकऱ्यांनी आतापासूनच खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामाला लागतो. पावसाळा सुरू होईपर्यंत नांगरणी, मोगडा, पाणी आदी मशागतीची कामे आटोपून तो पावसाची प्रतीक्षा करत असतो. या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळा अवेळी पाऊस झाल्याने पेरणीपूर्व कामाला उशिरा प्रारंभ झाला. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशाही स्थितीत शेतकरी कामाला लागले आहेत. मात्र, कामासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त झाले आहेत.
काळा बाजार रोखण्यासाठी आठ भरारी पथके : जिल्ह्यातबनावट बियाणे, खते, कीटकनाशक यांची विक्री होऊ नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक टळावी, यासाठी कृषी विभागाने आठ भरारी पथकांची स्थापना केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यात बनावट रासायनिक खत विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर वचक बसला आहे.
बैल गेले ट्रॅक्टर आले : आजवर बैलांकडून केली जाणारी कामे आता ट्रॅक्टरमार्फत केली जात आहेत. सधन शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांना तो परवडण्याजोगा नसल्याने त्यांना जशी होईल तशी बैलाकडून कामे करून घ्यावी लागत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या पतपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी ही प्रमुख पिके असून, मागील वर्षी पाऊस चांगला झाला नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर वादळी पावसाने रब्बी पिकाचे नुकसान केले.
अल निनोचा प्रभाव
गतवर्षी प्रमाणेच यंदाही मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार आहे. मान्सून केरळमध्ये धडकण्यापूर्वीच जर त्यासाठी आवश्यक असलेले बाष्प अल निनोने खेचून घेतले तर गत वर्षीप्रमाणेच यंदाही जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असेही हवामान खात्याने सांगितले. त्यानुसार यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला.
कारवाई करू
- जिल्ह्यात कुठे जर खताचा काळाबाजार होत असेल तर त्याची माहिती तत्काळ देण्यात यावी. माहितीवरून आम्ही संबंधितावर कारवाई करू. शिवाय, खबऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांची मािहती द्यावी.
हनुमंत मामंदे, कृषी अधिकारी
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, स्वतंत्र भारतात १३ मोठे दुष्काळ...कसा होतो मान्सूनचा प्रवास...