आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्झी फॅब्रिकची वाढली तरुणींत क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- फॅशन जगतात रोज काहीना काही बदल होत असतात. सध्या तरुणींमध्ये ट्रान्झी फॅब्रिकची क्रेझ आहे. शर्ट, टी-शर्ट, टॉप, कुर्ता या सर्व प्रकारांमध्ये सध्या हे फॅब्रिक लोकप्रिय ठरत आहे.
उन्हाळ्यात कूल फिल देणारे हे फॅब्रिक थोडे ट्रान्सपरंट आहे. जॉज्रेट आणि शिफॉन या प्रकारात हे येतात. ट्रान्सपरंट असल्याने यात इनर वापरले जाते. काही टॉपसोबत ते आधीच दिलेले असते, तर काही प्रकारात ते वेगळे घ्यावे लागते. लाइट आणि ब्राइट अशा दोन्ही रंगांमधील शर्ट, टी-शर्ट आणि टॉप तरुणींच्या पसंतीस उतरत आहेत. इनर प्लेन आणि टॉपवर डिझाइन असल्याने तरुणींना ते आकर्षित करत आहे. इनर आणि टॉप याच्या कॉन्ट्रास्ट कलरच्या वापराने याला वेगळा लूक येतो. कमरेपर्यंत आणि गुडघ्यापर्यंत असणार्‍या टॉपला जास्त मागणी आहे. डेली वेअर प्रमाणेच पार्टी वेअर म्हणून याचा वापर करता येतो. सिंपल, प्लेन, एम्ब्रॉयडरी वर्क, क्रिस्टल वर्क, फ्लॉवर प्रिंट, डिझाइनर, वेस्टर्न स्टाइल असे नानाविध डिझाइन बाजारात पाहायला मिळत आहेत. हे टॉप जवळपास 1000 ते 1500 रुपयांपर्यंत आहेत.
कप्तान स्टाइल कुर्ता
ट्रान्झी फॅब्रिकमधील कप्तान स्टाइल कुर्त्याला विशेष पसंती आहे. हा कुर्ता गुडघ्याच्या थोडा खालपर्यंत लांब असून, त्याचा टेलकट घेर आहे. नेहमीच्या कुर्त्याप्रमाणे कट किंवा घेर नसून, या कुर्त्याचा खालचा बाजूने घेर व्ही शेपमध्ये टर्न होतो. त्यामुळे याला वेगळा लूक येतो. तसेच या कुर्त्याला स्लिव्हज वेगळ्या नसून, त्याच कापडात स्लिव्ह आहेत. या कुर्त्याला सरळ केले, तर ते साधे चौकोन कापड असल्याचा भास होतो. याच्या वेगळ्या शिलाईमुळे त्याला आकर्षक लूक आला आहे. हे कुर्ते जवळपास 1500 ते 2500 रुपयांपर्यंत विविध डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.