आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेराहून पैसे आणण्यासाठी केला छळ, विवाहितेला मारणाऱ्या बाप-लेकास जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला रॉकेल टाकून पेटवून देत मारल्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये बाप-लेकास तीन वर्षे सक्तमजुरी, दंड जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अकोटच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. सु. बा. चव्हाण यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. दोन्ही आरोपींपैकी एक हा मृतक विवाहितेचा पती तर दुसरा सासरा आहे. या प्रकरणात नणंद तिच्या पतीची सुटका झाली आहे.

अकोट येथील अंबोलीवेस येथील रिझवाना खातून हिला २३ एप्रिल २०१२ रोजी पती मकसूद अली, सासरा सादिक अली यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, पोलिसांना दिलेल्या जबाबात रिझवाना हिने सांगितले की, पती मकसूद अली सादिक अली, सासरा सादिक अली असद अली, नणंद कमरुन्निसा एजाजखान नणंदवा मो. सादक मो. याकूब हे संगनमत करून माहेराहून आई-वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक मानसिक छळ करत होते. यातूनच जीवे मारण्याच्या प्रयत्नातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जबाबावरून उपरोक्त चौघांविरुद्ध पोलिसांनी कलम ३०७, ४९८ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रिझवानाचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींवरील गुन्ह्यांमध्ये ३०२ चे कलम समाविष्ट करण्यात आले.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सोनाली गुल्हाने लेखनिक अशोक पालेकर यांनी केला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्या. सु. बा. चव्हाण यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी मृतक रिझवानाने नाेंदवलेला मृत्यूपूर्व जबाब, पैकी साक्षीदारांचे जबाब, पुरावे सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला युक्तिवाद, यावरून आरोपी मकसूद अली सादिक अली सादिक अली असद अली या दोघांना भादंवि ४९८ (अ) मध्ये वर्षे सक्तमजुरी दंड प्रत्येकी दोन हजारांची शिक्षा न्या. सु. बा. चव्हाण यांनी बुधवारी सुनावली आहे.

कलम ३०२ नुसार शिक्षा
दंडभरल्यास महिने शिक्षा भादंवि कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ज. बा. गावंडे यांनी काम पाहिले, तर आरोपीकडून अॅड. दिलदारखान, अकोला यांनी बाजू मांडली.