आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाचा खून करणा-या सास-याला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार- मुलीला सतत त्रास देणा-या जावयाचा सास-याने काठीने मारून खून केल्याची घटना आज बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी वाजता लाेणार तालुक्यातील पळसखेड येथे घडली. पळसखेड येथील देवराव हरिभाऊ बोडखे वय ६० यांच्या मुलीचा विवाह अशोक रामकिसन सोनुने वय ४५ रा. पिंपळनेर याच्यासोबत २० वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान, अशोक हा पत्नीला नेहमी त्रास देत असल्याची तक्रार मुलीने वडिलांना दिली होती. अशातच जावई अशोक हा सासरवाडी पळसखेड येथे आला असता त्याने पत्नीला मारहाण केली. हे मुलीने वडिलांना सांगितल्याने वडिलांचा रागाचा पारा वाढल्याने त्यांनी जावई अशोक यास डोक्यावर, पाठीवर काठीने मारहाण केली. यात अशोक हा जखमी झाल्यामुळे तत्काळ ग्रामीण रुग्णालय लोणार येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. या प्रकरणाची तक्रार मृतकाचे वडील रामकिसन सोनुने यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सास-यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत बावीस्कर करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...