आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या खूनप्रकरणी पित्याला अटक; खडकी परिसरात घडली होती घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पित्यानेच पुत्राच्या आत्महत्येचा बनाव केल्याची बाब 10 डिसेंबरला उजेडात आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी पित्याला रात्री अटक केली. मुलगा गळफास लागलेल्या अवस्थेत आढळल्याचा प्रकार 3 डिसेंबरला खडकी परिसरात घडला.
पाटबंधारे विभागातील निवृत्त हेल्पर किसन शिवराम तेलगोटे (60) परिवारासह खडकी परिसरात राहतात. त्यांचा मुलगा राहुल हा खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करत होता. तो मद्य प्राशन करून अनेकदा कुटुंबीयांना मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. रात्री त्याचा मृतदेह लोखंडी पलंगाला लटकवून देण्यात आला. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनी किसन तेलगोटेची चौकशी केली. त्यामध्ये खून करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलिसांनी किसन तेलगोटेविरुद्ध भादंविचे कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
अहवाल, पंचनामा ठरला महत्त्वाचा
शवविच्छेदन अहवालात मृतक राहुलच्या गळ्याभोवती फासाच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. मृतक राहुल हा लोखंडी पलंगावर झोपला होता. त्याचा झोपेतच दोरीने गळा आवळण्यात आला. त्यानंतर त्याला बसलेल्या अवस्थेत पलंगाला लटकवून देण्यात आले होते. हा प्रकार संशयास्पद होता. त्या दिशेने तपासानंतर हा खुनाचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले.