आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाचे शोषण भोवले; शिक्षिकांवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शासकीय मूकबधिर विद्यालयातील बालकांच्या शोषणप्रकरणी दोन शिक्षिकांवर 13 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.

मूकबधिर विद्यालयातील मुलांकडून शिक्षिका पाय चेपून घेत असल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. विद्यालयातील विद्यार्थ्याकडून शिक्षिका मालीश करून घेत होती. त्यामुळे याप्रकरणी 13 नोव्हेंबरला विद्यार्थ्याच्या आईने खदान पोलिसात तक्रार दिली. बालहक्कांसाठी विधी साहाय्यता कक्षानेही खदानच्या ठाणेदारांना पत्र दिले होते. याप्रकरणी संबंधित शिक्षिकांवर कारवाई करण्याचेही पत्रात नमूद होते. कक्षाचे समन्वयक अँड. नितीन धूत यांनी ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्याशी चर्चा केली. अखेर पोलिसांनी विशेष शिक्षिका शीतल अवचार आणि सोळंके यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियमनाचे कलम 8 (लैंगिक शोषण), 12, 17 अन्वये गुन्हा केला.

काय सांगतो अधिनियम?
गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा, दंड होऊ शकतो. या अधिनियमाचे खटले विशेष न्यायालयात चालवण्यात येतात. अधिनियमामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत, अशी माहिती बालहक्कांसाठी विधी साहाय्यता कक्षाचे समन्वयक अँड. नितीन धूत यांनी दिली.