आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदेशाला केराची टोपली : ‘फायर ऑडिट’ची पाटी कोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मंत्रालयातलागलेल्या आगीनंतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या संचालकांनी एक आदेश काढून फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या खऱ्या. परंतु, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दिल्याचेच दिसून येत आहे. जिल्ह्यात फायर ऑडिटची पाटी कोरीच असून, आगीच्या घटनेतून कुठलाही बाेध घेतला नसल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

जिल्हा न्यायालयासह जिल्हा परिषद, पोिलस स्टेशन, तहसील कार्यालयासह अनेक महत्त्वाच्या शासकीय संस्थांचे फायर ऑडिट बाकी आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या अग्निशमन विभागाच्या दीड वर्षांपूर्वी केलेल्या आदेशाकडे एकप्रकारे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांच्या या दिरंगाईमुळे शासकीय दस्तऐवज, तर सुरक्षित नाहीतच. पण, कर्मचाऱ्यांचाही जीव मुठीत आहे. राज्याला मंत्रालयात जून २०१२ मार्च २०१३ मध्ये दोनदा आग लागून महत्त्वाच्या दस्तएेवजसह अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या आगीच्या कारणांचा उलगडा झाला नसला, तरी आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालय, खासगी संस्थांसह रुग्णालयांचे फायर ऑडिट व्हावे, असा मुद्दा समोर आला. आदेश देऊन दीड वर्षाचा कालावधी लाेटला, तरी अद्यापही शासकीय कार्यालय प्रमुखांनी आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणत्याही क्षणी आग लागण्याची भीती नाकारता येत नाही. िशवाय आगीपासून बचावासाठी कोणतीही उपाययोजना नसून घडलेल्या घटनांमधूनही काहीही बाेध घेतला नसल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांचाही जीवसुद्धा धोक्यातच आहे, असेच म्हणावे लागेल.

धुरामागचेराजकारण : अनेकघोटाळे भ्रष्टाचाराचे पुरावे लपविण्यासाठी आग लावण्यात येत असल्याच्या चर्चा आगीच्या घटनेनंतर केल्या जातात. त्यामुळे धुरामागचे हे राजकारण अधिकाऱ्यांना चांगलेच माहित असते.

पत्राकडेही दुर्लक्ष : सर्वचसंस्थांना फायर ऑडीट करण्याच्या सूचना अग्निशमन विभागाने लेखी स्वरूपात दिल्या आहेत. पण या पत्राची कुठलीही दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसून येत नाही.
फायर ऑडट झाले पण उपाययोजना नाहीत
सर्वोपचाररूग्णालय, आरोग्य उपसंचालक कार्यालयांसह अनेक कार्यालयांचे फायर ऑडीट पुर्ण झाले. अग्नीशमन विभागाकडून प्रमाणपत्रही मिळवले. मात्र कोणत्याही उपायोजना करण्यात अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली आहे.
दस्तऐवज असुरक्षित
िजल्ह्यातीलसर्वच पोिलस स्टेशन तहसील कार्यालयात महत्वाचे दस्तऐवज असतात. आज हे दस्तेएवज केवळ िपवळया लाल कापडात बांधून सज्जावर ठेवलेले आढळतात. या दस्तऐवजांना कधीही आग लागू शकते अशी परिस्थीती आहे. मात्र या दस्तएेवजांच्या सुरक्षेबाबत कार्यालय प्रमुखांकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे वास्तव आहे.