आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळांमध्ये वाजणार आज पहिली घंटा; विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छाने करणार स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक वर्षाला 26 जूनपासून सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्य आणि प्रत्येक अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 2 हजार 141 शाळांची गुरुवारी सकाळी घंटा वाजणार आहे. सप्टेंबर 2013 च्या पटनिर्धारणानुसार जिल्हा परिषदेत 1 लाख 97 हजार 441 विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गात आहेत. यातील विद्यार्थ्यांची संख्या यंदा कमी होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक दर्जातील घसरण पाहता, अनेक पालकांनी पाल्यांना खासगी शाळेत घातले आहे.

स्पर्धेच्या काळात इंग्रजीचे शिक्षण अत्यावश्यक असताना पूर्वीच्या शिक्षणावर जिल्हा परिषद भर देत आहे. शैक्षणिक कार्याकडे लक्ष देण्याऐवजी अशैक्षणिक कार्यालयाकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना जास्त ‘इंटरेस्ट’ आला आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्वच्छ करून ठेवण्याचे निर्देशही काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्याचप्रमाणे गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्याचेही निर्देश जारी केले आहेत. पहिल्या दिवसाची तयारी शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे.
वर्ग जोडणी शिक्षकांना ठरणार त्रासदायक
यंदाच्या शैक्षणिक वर्षांत पाचवा आणि आठवा वर्ग काही शाळांना जोडण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतून विद्यार्थ्यांना ‘टीसी’ देण्यात आली नाही. शिक्षण विभागाने पाचवा वर्ग जोडण्यासाठी 937, आणि आठवा वर्ग जोडण्याचा 375 चा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला होता. शिक्षण विभागाला अतिरिक्त वर्ग जोडण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, अद्याप या वर्गासाठी अतिरिक्त शिक्षक देण्यात आले नाहीत. सप्टेंबर महिन्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, तोपर्यंत पूर्वीच्याच शिक्षकांना शैक्षणिक कार्य करावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे.
गटशिक्षणाधिकार्‍यांना पाठवले पत्र
अतिरिक्त वर्ग जोडणीची माहिती 15 मे 2014 रोजीच गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. आंतर आणि पटसंख्येच्या आधारावर अतिरिक्त वर्ग जोडणी करण्यात आली आहे. या वर्गातील मुलांना पूर्वीचेच शिक्षक शिकवणार आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर सर्व ठिकाणी शिक्षक देण्यात येणार आहे. तोपर्यंत पूर्वीच्याच शिक्षकांवर ही जबाबदारी आहे. दरम्यान 25 जून रोजी जिल्ह्यातील सोळाही पंचायत समितीच्या बीईओंना पत्र पाठवण्यात आले आहे.’’
डॉ. वाल्मिक इंगोले, उपशिक्षणाधिकारी, सर्वशिक्षा अभियान, यवतमाळ.

(फोटो - संग्रहीत फोटो)