आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Time Hi Tech Technology Use By Akola Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेत प्रथमच होतोय हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकाआता प्रथमच हायटेक प्रणालीचा वापर करणार आहे. उपमहापौर विनोद मापारी यांनी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिव्हाइस बसवण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला मूर्तरूप येणार असून, या आठवड्यात महापालिकेच्या दोन वाहनांवर डिव्हाइस बसवले जाणार आहे. जीपीआरएस प्रणालीच्या माध्यमातून मोबाइलच्या साहाय्याने तूर्तास दोन वाहनांची माहिती बसल्या-बसल्या मिळणार आहे. या नव्या उपाययोजनामुळे इंधन घोटाळा मात्र, रोखल्या जाणार आहे.
महापालिकेत पदाधिका-यांसह कचरा वाहणारी वाहने, ट्रॅक्टर, जेसीबी मशीन, जनावरे पकडण्याचे वाहन आदी वाहने महापालिकेच्या मालकीची आहेत. जेसीबी मशीनला तासाला डिझेल लागते, तर पदाधिकारी तसेच कचरा उचलणा-या वाहनात दररोज पाच ते पंधरा लीटर डिझेल टाकले जाते. परंतु, मिळालेल्या डिझेलमध्ये नेमकी किती किलोमीटर वाहन चालले, जेसीबी किती तास चालली? याची माहिती कागदोपत्री दिली जाते. दिलेली ही सत्य असो वा नसो, ती सत्यच मानावे लागते. यामुळे महापालिकेचे इंधनावर दररोज हजारो रुपये खर्च होतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठीच महापालिकेच्या वाहनांवर जीपीआरएस प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव उपमहापौर विनोद मापारी यांनी प्रशासनाकडे मांडला होता. हा प्रस्ताव आता मूर्तरूप घेणार असून, या आठवड्यात कोंडवाडा विभागाचे मोकाट कुत्रे पकडणारे वाहन तसेच मोरी वॉटर या दोन वाहनांवर डिव्हाइस बसवले जाणार आहे. त्यामुळे ही दोन्ही वाहने दिवसभर कुठे-कुठे फिरली? कुठे किती वेळ थांबली? आदी इत्यंभूत माहिती मिळणार आहे. एक डिव्हाइस बसवण्यासाठी २४ हजार रुपये खर्च येणार आहे.

उपमहापौर विनोद मापारी संगणक तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. याचा वापर त्यांनी जनतेशी नाळ बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला आहे. मोबाइलच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण प्रभागातील मतदारांना जोडले आहे. पाणीपुरवठा, नोकरीच्या संधी या माहितीसह ते त्यांच्या प्रभागातील नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. उपमहापौर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या कामकाजात सुधारणा व्हावी, यासाठी संगणक प्रणालीचा अधिकाधिक उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मोबाइलवरच मिळणार माहिती : डिव्हाइसबसवलेले वाहन नेमके कुठे आहे? याची माहिती जीपीआरएस प्रणालीच्या माध्यमातून मोबाइलवरच मिळणार आहे. वाहन सुरू आहे की बंद आहे. प्रवास किती झाला? याची इत्थंभूत माहिती मोबाइलवरच उपलब्ध होणार आहे.

खोटे बोलणे बंद होईल : जेसीबीमशीन असो वा एखाद्या वाहनावरील वाहनचालक असो. त्याला आता तू कुठे आहेस? असा प्रश्न केल्यानंतर खोटे बोलता येणार नाही. कारण संबंधित अधिका-याच्या कक्षात ही माहिती आधीच मिळेल. त्यामुळे त्यांना खोटे बोलता येणार नाही.

लवकरच कार्यान्वित होणार
प्रणालीचीअंमलबजावणी केल्यास इंधन खर्चात बचत होईल. ही प्रणाली मनपासाठी उपयुक्त, फायदेशीर ठरणारी आहे. दोन वाहनांवर या आठवड्यात डिव्हाइस लावले जातील, ही प्रणाली कार्यान्वितही होईल.'' विनोदमापारी, उपमहापौर, महापालिका अकोला