आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला आजपासून होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काटेपूर्णा प्रकल्पातील आरक्षित पाण्याची पूर्ण उचल केल्याने तसेच पावसाने दांडी मारल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पाच जुलैपासून होत आहे. त्यामुळे पाच जुलैपासून नागरिकांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महापालिकेतील सत्ताधारी आघाडीने काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा असल्याने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाच दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला. संपूर्ण तांत्रिक दुरुस्त्या केल्याशिवाय दोन दिवसाआड पाणीपुरवठा करू नये, अशी विनंती पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी केली होती, परंतु अभियंत्याचे कोणतेही म्हणणे न ऐकता दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. निवडणुकीत भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा ख-या अर्थाने अस्तित्वात आली नाही. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने अधिक पाण्याची उचल करावी लागली. त्यामुळे आरक्षित पाण्याची उचल नियोजित वेळेपेक्षा आधीच झाली, तर दुसरीकडे पावसाने दांडी मारली. त्यामुळे पाणीपुरवठा पाच दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाला घ्यावा लागला.
आज होणार या भागाला पाणीपुरवठा
ताजनगर, हबीबनगर, खैर महंमद प्लॉट, नबाबपुरा, अक्कलकोट, पोळा चौक, सोनटक्के प्लॉट, भारती प्लॉट, शिवनगर, इंदिरा कॉलनी, गणेशनगर, गोडबोले प्लॉट, रेणुकानगरचा काही भाग, शांतीनगर, भीमनगर, चहाचा कारखाना, ज्ञानेश्वरनगर, डाबकी रोड, फडकेनगर, जोगळेकर प्लॉट, कोमटीपुरा, शिवाजीनगर, गोंडपुरा, साईनगर, सावजी कॉन्व्हेंट, वानखडेनगरचा काही भाग, खदान भाग, जेतवननगर, हैदरपुरा, मुलानी चौक, झिराबावडी, ढोरबाजार, ख्रिश्चन कॉलनी, बाजोरियानगर, जाजूनगर, वाठुरकर ले-आउट, शासकीय गोडाऊन, सिंधी कॅम्प, कच्ची खोली, पक्की खोली, महात्मा फुले नगर, शास्त्रीनगर, पेन्शनपुरा, कैलास टेकडी, केशवनगर, साईनाथनगर, एसबीआय कॉलनी, टीटीएन, संतनगर, सोलाशे प्लॉट, अशोकनगर, आंबेडकर चौक, भीम चौक, पिंपळफैल, मस्तान चौक, राजीवनगर, अकबर प्लॉट, परदेशीपुरा, गायकवाड मोहल्ला, हाजीनगर, आपातापा रोड, संत कबीर नगर, बापूनगर, पूरपीडित कॉलनी, भोईपुरा, अकोट रोड, तोष्णीवाल ले-आउट, अमानखाँ प्लॉट, शास्त्रीनगर, दूध डेअरीच्या मागचा भाग, लहान उमरी, मुनलाइट हॉटेल, अष्टविनायकनगर, दीक्षित वाडी, दत्तवाडी, विठ्ठल फैल, गजाननपेठ, रामदासपेठ, गड्डम प्लॉट.

तेरा टक्के कपात
- पाच दिवसाआड पाणीपुरवठा करतानाच पाणीपुरवठ्यात 13 टक्के कपात करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. यापूर्वी दरडोई 120 लिटर पाणीपुरवठा केला जात होता. आता दरडोई 105 लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे.’’ एस.पी. काळे, कार्यकारी अभियंता, महापालिका पाणीपुरवठा विभाग.