आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात वीट घालून जखमी करणाऱ्याची निर्दोष सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रस्त्यावर सुरू असलेल्या पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्याच्या डोक्यावर पतीने वीट मारून जखमी केले होते. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एस. पठाडे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आठ साक्षीदार तपासून आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. श्रीकृष्ण रामभाऊ बोदडे यांनी सन २००७ मध्ये त्यांच्या खदान परिसरातील गुरुनानक विद्यालयासमोरील दुकानासमाेर गजानन जनार्दन वाळके त्यांच्या पत्नीचे भांडण सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीच्या वतीने अॅड. वैशाली गिरी भारती, अॅड. केशव गिरी यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे, सरकार पक्षाच्या वतीने तीन सरकारी वकिलांनी फिर्यादीची बाजू मांडली होती.
बातम्या आणखी आहेत...