आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाराऐवजी आता हात जोडा; पावसामुळे बसला फुलांना फटका;

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- यंदा पावसाने फुलशेती उद्ध्वस्त झाली असून, फुलांचे हार तिपटीने महागले आहेत. तर फुलांची आयात सुरत, हैद्राबाद, इंदोर येथून होत आहे. या वर्षी पाऊस अधिक झाला. त्यामुळे फुलशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पर्यायाने फुलांचे उत्पादन थांबले आहे. गणेशोत्सव काळात तर फुलांचा 10 रुपयांचा हार 30 रुपयांना मिळत आहे. गणेशभक्तांची इच्छा असूनही भाव वाढल्याने हार खरेदी करण्याबाबत त्यांची नाराजी दिसत आहे. शहरामध्ये 300 फुले व हार विक्रीची दुकाने आहेत. बाप्पांच्या उत्सव काळात फुलांचे व हारांचे भाव वाढल्याने भाविकांच्या खिशावर भार पडत आहे. झेंडू, लीली, शेवंती, गुलाब आदी फुलांचे, हारांचे भाव गगनाला भिडले आहेत.

फुलेच नाहीत
बाजारात फुलेच नाहीत. त्यामुळे सुरत, इंदौर येथून माल आणावा लागत आहे. त्यामुळे हारांची किंमत वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांची नाराजी होत आहे.
- नासिर खान, विक्रेता.

किंमत परवडत नाही
गणेशाला हार वाहिले जातात. मात्र हारांची किंमत एवढी वाढली आहे की, परवडत नाही. त्यामुळे देवाला फक्त हात जोडतो.’’ आशीष शिंदे