आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न, औषध परवान्यास आता ऑनलाइन चालान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अन्न,औषध क्षेत्रातील व्यवसायाच्या नवीन परवान्यासाठी भरण्यात येणारे चालान आता ऑनलाइन पद्धतीने भरण्याचा निर्णय अन्न औषध प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणीही 27 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याने परवान्यासाठी अन्न औषध प्रशासन कार्यालयातील चकरा कमी होणार आहेत.
अन्न, औषध क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडे नोंदणी करून परवाना घ्यावा लागतो. यासाठी पूर्वी लेखी अर्ज करावा लागत होता. वर्षभरापासून ही प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आलेली आहे. मात्र, नवीन परवान्यासाठी भरावे लागणारे परवाना शुल्क सहायक आयुक्तांच्या कार्यालयात जमा करावे लागत होते. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी, पडताळणीसाठी, चालान भरण्यासाठी अर्जदारांना अन्न औषध प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत होते.
अर्जदारांचा त्रास कमी व्हावा आणि परवान्यांची संख्या वाढण्यासाठी अन्न प्रशासनाने परवाना देण्याबरोबरच चालान भरण्याची प्रक्रियाही ऑनलाइन केली आहे. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचे परवाना शुल्क भरण्यासाठी कार्यालयात चकरा मारणाऱ्या अर्जदारांचे खोटे वाचणार आहेत. दरम्यान, अन्न औषध प्रशासनाच्या या निर्णयाची अद्याप सामान्यांना माहिती नसल्याने अनेक जण कार्यालयात येऊन संकेतस्थळ, चालान भरण्याच्या प्रक्रियेविषयी विचारणा करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांचा वेळ वाचेल
अनेकदाकिरकोळ शुल्क भरण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयात येत होते. त्यांचा वेळ आणि पैसे याचा अपव्यय होत होता. ऑनलाइनच्या निर्णयामुळे अर्जदारांना फायदा होईल. परवाना देण्याची प्रक्रिया यापूर्वीच कार्यालयात ऑनलाइन करण्यात आली आहे. शरदकोलते, सहायकआयुक्त, अकोला