आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून फोडणीला देता येणार अतिरिक्त तडका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील गृहिंणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. खाद्यतेल व भाजीपाल्याचे भाव घसरल्याने फोडणीचा तडका घराघरात आजपासून जोरदार बसेल. त्यामुळे घरातील सर्वांनाच खमंग भाजीची चव चाखता येणार आहे. खाद्यतेल व भाज्यांचे दर घसरल्याने हे सर्व शक्य होणार आहे. सर्वसामान्यांच्या जिभेवर ही चव किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

प्रचंड वाढलेल्या महागाईत खाद्यतेल प्रतिकिलो 20 रुपयांनी स्वस्त झाल्याने गृहिणी सुखावल्या असतानाच त्यांच्या आनंदात आणखी भर घातली तसेच भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे गृहिणी सुखावल्या आहेत. रोजच्या उपयोगातील वस्तूंचे दर कमी झाल्याने गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या आठवड्यात पाऊस जास्त झाल्याने भाज्यांची आवक घटण्याची चिन्हे होती. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता बळावली. मात्र, भाजीपाल्यांच्या मुबलक उपलब्धतेमुळे भाव कमी झाले. त्यामुळे रोज कोणती भाजी करावी, हा गृहिणींसमोरील प्रश्न तूर्तास सुटला आहे.

बच्चे कंपनीला डब्यात रोज वेगळी भाजी मिळणार यामुळे शाळेत जाणारी मुले, मुली आनंदी असले तरी, भेंडीची महाग भाजी मिळणार नाही म्हणून थोडे नाराज झाले आहे.

फल्लीतेल आणि भाज्यांच्या कमी झालेल्या दरामुळे गृहिणींची या महिन्यात बरीच बचत होणार आहे. त्यामुळे महिलांची घराचे बजेट करताना होणारी ओढाताण कमी होणार आहे.

भाव स्थिर राहावे
या महिन्यात काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव घसरले असले तरी ते असेच स्थिर राहिले पाहिजे. एका वस्तूचे भाव कमी झाले की, दुसर्‍याचे वाढवले जातात, असे होऊ नये. भाव स्थिर राहिल्यास जास्त आनंद आहे.’’ सुलोचना जायभाये, गृहिणी