आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधान मुख्य वनसंरक्षकांची ‘काटेपूर्णा’ अभयारण्यास भेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील काटेपूर्णा अभयारण्यास 28 सप्टेंबरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूरचे एस. डब्ल्यू. एस. नकवी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक व्याघ्र प्रकल्प, अमरावतीचे दिनेशचंद्र त्यागी यांनी भेट दिली.

जिल्हय़ातील एकमेव काटेपूर्णा अभयारण्याला भेट देऊन त्यांनी अभयारण्यात राबवण्यात येणारे विविध उपक्रम, संवर्धनाच्या उपाययोजना, पर्यावरणपूरक पर्यटन, ग्राम परिस्थितीकीय विकास समिती आदींची माहिती घेतली. तसेच अभयारण्यातील काही स्थळांना भेटी दिल्या. यावेळी काटेपुर्णा अभयारण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधला. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. दुपारनंतर त्यांनी अकोला वनविभागाच्या क्षेत्रांतर्गत येणार्‍या वाशिम जिल्हय़ातील कारंजा सोहोळ अभयारण्यासही भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचना केल्या.

यावेळी त्यांनी नवनिर्मित निसर्ग परिचय केंद्राला भेट दिली. तसेच या केंद्राबाबतची माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांचेसोबत अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही. बी. धोकटे, उपवनसंरक्षक विजय गोडबोले, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, साहाय्यक उपवनसंरक्षक रमेशप्रसाद दुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. पुयाड, काटेपूर्णा सल्लागार समितीचे सदस्य गोविंद पांडे आदींची उपस्थिती होती. या वेळी त्यांनी वनाधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांना सूचना दिल्या. कार्यक्रमाचे संचालन गोविंद पांडे यांनी केले. एस. एन. पुयाड यांनी आभार मानले.