आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- वांगेश्वर येथे देवदर्शनासाठी आले असता अंघोळीसाठी नदीत गेलेल्या बाळापूर नाका, अकोला येथील २४ वर्षीय बेपत्ता युवक आकाश विरोकार याचा मृतदेह आज, २३ जून रोजी वांगरगाव शिवारात सापडला.

बाळापूर नाका, अकोला येथील रहिवासी आकाश किशोर विरोकार सात सोबत्यांसह अधिक मासानिमित्त तालुक्यातील वांगेश्वर येथे देवदर्शनासाठी आला होता. देवदर्शनापूर्वी अंघोळीसाठी पूर्णा नदीत गेला असता आकाश विरोकार हा युवक नदीत पाय घसरून २२ जून रोजी दुपारी वाजता बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतला असता तब्बल २४ तासांनंतर २३ जून रोजी वांगरगाव शेतशिवारानजीक पूर्णा नदीत त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहास शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतदेह शोधण्यासाठी िपंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाचे दीपक सदाफळे, लखन सुरळकर, सागर आखेकर, संतोष मुंगळे, सचिन बंड, चक्रधर मोरे यांनी प्रयत्न करून मृतदेह काढला. पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जानराव चव्हाण करीत आहेत.
मित्र वाचवण्यात यश : आकाशदोन मित्रांसोबत पाण्यात उतरला होता. तिघांना पाण्याचा अंदाज आल्याने तिघेही बुडू लागले. या वेळी इतर मित्र मदतीला धावले. मात्र, त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले.

आधार हरवला : आकाशमूळचा सावरपाटीचा राहणारा असून, तो अकोल्यातील खरोटे ज्वेलर्समध्ये काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देत होता. मात्र, त्याच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाचा आधारच हरवला गेलाय. त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती अकोल्यात माहिती पडताच त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर काेसळला.
पालक पंढरपूरला
आकाशचेआई-वडील विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेले आहेत. आकाश हा वांगेश्वरला देवदर्शनासाठी आला होता. भक्तीची ओढ असलेल्या या कुटुंबीयांवर अखेर नियतीने घाला घातला. आकाशच्या मृत्यूने कुटंुबीयांवर आकाशच कोसळले आहे.
बातम्या आणखी आहेत...