आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात चार शेतक-यांच्या आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/वर्धा - नापिकी, कर्जाचा डोंगरामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे दुष्टचक्र संपण्याचे नाव घेत नाही.अकोला जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने बडनेरा रेल्वे स्थानकावर तर वर्धा जिल्ह्यात तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना 31 ऑक्टोबर रोजी घडली.

अकोला तालुक्यातील रामगाव येथील अर्जुन हरिभाऊ गावंडे यांनी बडनेरा रेल्वेस्थानकावर स्वत:ला रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली.सोयाबीन आणि उडीद हे दोन्ही पिके हातची गेल्याने त्यांच्यावर अधिक कर्जाचे ओझे झाले. त्यामुळे गावंडे यांची मन:स्थिती ठीक नव्हती. शेगावला जातो म्हणून ते घरून गेल्या दोन दिवसांपूर्वी निघून गेले होते. बुधवारी मध्यरात्री त्यांनी बडनेरा रेल्वेस्थानकावर स्वत:ला रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली.

वर्धा जिल्ह्यातील अनिल रमेशराव वडतकर (34) रा. येसंबा आणि देविदास ठाकरे रा. सोरटा व विठ्ल किसनाची लढी रा.आरंभा या शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. अनिल वडतकर बुधवारी (ता.30) रात्री घरून निघून गेले.

शोध घेतला असता गुरुवारी सकाळी स्वत:च्याच शेतामध्ये त्यांचा मृतदेह आढळला. दुसर्‍या घटनेतील देविदास ठाकरे यांनी बुधवारी (ता.30) रात्री घरासमोरील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता.31) सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला. वडतकर यांचा मृतदेह संतप्त झालेल्या कुटूंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकार्‍यांनी भेट वडतकर यांच्या कुटूंबियांचे सात्वन केल्याने प्रकरण निवळले. समुद्रपूर तालुक्याच्या आरंभा येथील विठ्ठल लढी शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची बाब दुपारी पुढे आली. या घटनांमुळे वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.