आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिने धार्मिक सण-उत्सवांची रेलचेल;13 नोव्हेंबरनंतर लग्नांची धामधूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला- चतुर्मासात आषाढी एकादशीपासून विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यात नागपंचमी, श्रावण सोमवार, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, महालक्ष्मी (गौरी) पूजन, श्राद्धपक्ष (सर्वपित्री अमावस्या), नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा तसेच दिवाळी पर्वाचा समावेश आहे. यादरम्यान लग्नसमारंभ होणार नाहीत; मात्र 13 नोव्हेंबरपासून लग्नाची धामधूम सुरू होणार आहे.

पंडित गदाधर शास्त्री यांनी सांगितले आषाढातील पाच दिवस, श्रावणाचे 30 दिवस, भाद्रपदचे 30 दिवस, अश्विनचे 30 दिवस आणि कार्तिकचे 11 दिवस मिळून चंद्रमासच्या हिशेबाने 106, तर सौरमासच्या हिशेबाने 108 दिवसांचा चतुर्मास बनतो. विष्णू शयनच्या वेळेस तंत्र शास्त्राचे ज्ञान प्राप्त करण्याची वेळ येते. हे चार महिने इतके सिद्ध असतात की या महिन्यात कृष्ण, शिव, गणपती, दुर्गा आणि सूर्याचे पूजन होते. शंकर देव जागे झाल्यावर लगेच श्रावण महिन्यात त्यांची पूजाअर्चा सुरू होते. चतुर्मासच्या काळात देवतांचा शयन काळ असल्याने मांगलिक कार्य होत नाहीत. फक्त गणेश चतुर्थीचा काळ आणि नवरात्रीचे नऊ दिवसांत गृहप्रवेशासारखी मंगल कार्य होऊ शकतात. चतुर्मासच्या काळात साधू, संत, भ्रमण करत नाहीत.

चतुर्मासमध्ये येतील हे सण
श्रावण सोमवार 12 ऑगस्ट, 19 व 26 ऑगस्ट, नागपंचमी 11 ऑगस्ट, रक्षाबंधन 20 ऑगस्ट, तीज 23, श्रीकृष्ण जन्माष्टमी 28, ब्रज बारस 2 सप्टेंबर, पोळा 5, हरतालिका 8, गणेशोत्सव 9 ते 18 सप्टेंबर, ऋषिपंचमी 10 सप्टेंबर, राधाअष्टमी 13 सप्टेंबर, नवरात्र 5 ते 13 सप्टेंबर, दसरा 14 ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमा 18 ऑक्टोबर, करवा चौथ 22 ऑक्टोबर, अहोर्द अष्टमी 26 ऑक्टोबर, धनत्रयोदशी 1 नोव्हेंबर, नरक चतुर्दशी 2 नोव्हेंबर, लक्ष्मीपूजन 3 नोव्हेंबर, पाडवा 4 नोव्हेंबर, भाऊबीज 5 नोव्हेंबर, छट पूजा 8 नोव्हेंबर, गोपाष्टमी 10 नोव्हेंबर, आवळाष्टमी 11 नोव्हेंबर, देव उठनी (कार्तिकी) एकादशी 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर तुलसी विवाह.