आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वार विद्यार्थी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भर धावचारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने मंगळवारी दुपारी वाजता अमरावतीत झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार विद्यार्थी ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. मृतक विद्यार्थी हा अकोला शहरातील असून, त्याचे नाव स्वप्निल विजयराव दुरडकर, असे आहे.
अमरावती येथे बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वळणावर घडलेल्या या अपघातात रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी स्वप्निल विजयराव दुरडकर अमित चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डॉ. बोंडे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, स्वप्निल यास नागपूर येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. स्वप्निल हा डाबकी रोड अकोला येथील रहिवासी असून, राजापेठ परिसरात रूम करून राहत होता. तो आपल्या मित्रासोबत (एमएच २७ एएल ७२४) क्रमांकाच्या दुचाकीने महाविद्यालयातून घरी परत येत होता. त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ३० ईएल ४३३३) जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीची मागील बाजू पूर्णत: चक्काचूर झाली, तर चारचाकी वाहनाचेदेखील समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बडनेरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, स्वप्निलचा मृतदेह रात्रीच अकोला येथे आणण्यात आला. आज, एप्रिल रोजी दुपारी शवविच्छेदनानंतर त्याच्यावर बारलिंगा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्याचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने अमरावती येथून हजर झाला होता.