आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four year old Girl Killed In The Road Accident In Akola

बोर्डी फाट्याजवळ टाटा सुमोच्या धडकेत चार वर्षीय चिमुकली ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- टाटा सुमोच्या धडकेत एक चार वर्षीय चिमुकली ठार झाल्याची घटना अकोट ते पोपटखेड मार्गावर बोर्डी फाट्याजवळ सोमवारी सकाळी वाजता घडली. वाहनचालकास अटक करून त्याच्याविरुद्ध अकोट पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन महाराजांच्या विहिरीवरून दर्शन घेऊन परत येत असताना टाटा सुमो क्रमांक एमएच ०६ डब्ल्यू २४६५च्या चालकाने भरधाव निष्काळजीपणे वाहन चालवून निर्जला मांगीलाल कासदेकर या चिमुकलीला धडक दिली. जखमी अवस्थेत तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निर्जलाचे आईवडील हे मोहाळा येथील इम्रान उल्लाखाँ अजहरखाँ यांच्या शेतामध्ये बऱ्याच वर्षांपासून रखवालदार म्हणून वास्तव्यास आहेत. या घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
इम्रान उल्लाखाँ अजहरखाँ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहनचालक दीपक कात्रे रा. अकोट याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवत त्याला अटक केली अाहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोंद्रे, वस्तापूरचे सरपंच संजय कासदे, इम्रान पटेल जहीर पटेल हरीश पटेल यांनी निर्जलास रुग्णालयात हलवण्यासाठी सहकार्य केले.