आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतासाठी युवकास चार जणांकडून मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करण्यावरून चौघांनी एका युवकास मारहाण केल्याची घटना हेंडज येथे 1 डिसेंबरला घडली.
जि.प. माना सर्कलअंतर्गत हेंडज येथे रविवारी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी प्रमोद सोळंके हे त्यांच्या नातेवाइकांसह मतदानासाठी आले. त्यांच्याशी चौघांनी विशिष्ट उमेदवारालाच मतदान कर, असे म्हणत वाद घातला. वादातून त्यांच्यावर लाठी, पाइपने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात अजाबराव सोळंके, सागर सोळंके, वासुदेव राठोड आणि पुरुषोत्तम सोळंके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लावखेड येथे हाणामारी
निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान लावखेड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. एक जण मतदान करून परत येत होता, तर दुसरा मतदानासाठी जात होता. या वेळी या दोघांमध्ये वाद झाला व वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. भांडण सोडवण्यासाठी गेलेले रितेश दुतोंडेही जखमी झाले. याप्रकरणी चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.