आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्ज फसवणूक प्रकरण: तोतया बँक अधिकारी पोलिस कोठडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कर्ज देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणार्‍या तोतया बँक अधिकार्‍याची 26 आगॅस्ट रोजी पोलिस कोठडीत रवानगी केली गेली. फसवणुकीचा प्रकार 25 ऑगस्ट रोजी उजेडात आला. धनराज पाटील, असे या तोतया अधिकार्‍याचे नाव असून, पुणे येथील रहिवासी आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार धनराज पाटील हा तोतया स्टेट बँक अधिकारी म्हणून मलकापूर परिसरात गेला. त्याने महिला व पुरुषांना सूक्ष्म लघुउद्योग योजनेंतर्गत 25 हजार रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्याने कर्ज मिळण्यासाठी 8 ते 10 हजार रुपयेही उकळले होते. अशाच प्रकारे कर्ज मिळून देण्यासाठी तो शिवसेना वसाहतीमध्ये गेला होता. मात्र, या ठिकाणी पर्दाफाश झाला.

दरम्यान जुने शहर पोलिसांनी त्याला 26 ऑगस्ट रोजी प्रथम र्शेणी न्यायदंडाधिकारी सराफ यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची 29 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. सरकारकडून अँड. जी. एल. इंगोले यांनी युक्तिवाद केला. आरोपींची बाजू अँड. पप्पू मोरवाल, अँड. गणेश शर्मा आणि अँड. गजानन भोपळे यांनी बाजू मांडली.

महिलांना दिल्या स्लिप
तोतया बँक अधिकारी धनराज पाटीलने मलकापूर परिसरातील महिला आणि पुरुषांना स्टेट बँकेच्या स्लिप दिल्या. स्लिप्सवर कर्जदाराचे नाव, 560 रुपये मिळण्याचा उल्लेख होता. या स्लिपवर धनराज पाटीलने पीआरओ म्हणून स्वाक्षरी केली, तसेच शिक्काही मारला.