आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंडवले: कर्ज देण्याच्या नावाखाली महिलांची केली फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एका तोतया बँक अधिकार्‍याने कर्ज देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार 25 ऑगस्टला उजेडात आला. जुने शहर पोलिसांनी या तोतया अधिकार्‍याला हॉटेल राजेश्वरीमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेलमधील त्याच्या रूममधून बोगस निवडणूक ओळखपत्राच्या छायांकित प्रती, लाभार्थींची यादी, व्हिडिओ गेमसह इतरही साहित्य जप्त केले. धनराज पाटील, असे या तोतया अधिकार्‍याचे नाव असून, पुणे येथे राहत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दिगंबर शिंपी, हेड कॉन्स्टेबल रवींद्र करनकार, संजय पांडे, नेहा ठाकूर, धर्मेंद्र ठाकूर यांनी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरूहोती.

पुण्यातही गुन्हा दाखल
धनराज पाटीलवर एक वर्षापूर्वी पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात त्याने 150 महिला-पुरुषांची फसवणूक केली होती. तो जवळपास आठ महिने कारागृहात होता. दरम्यान, चार वर्षांपूर्वी संगणक अभ्यासक्रमातील पदविका उत्तीर्ण केल्याचा दावा धनराज पाटीलने केला आहे. घरात आई आणि लहान भाऊ आहे. वडिलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या जबाबदारी आली. पैसे नसल्याने शैक्षणिक कागदपत्रे मिळाली नाहीत. परिणामी मला नोकरी मिळाली नाही, असे पाटीलचे म्हणणे आहे.

निवडणूक ओळखपत्र बनावट
धनराज पाटीलने इंटरनेटवरून प्रकाश छगन सलामपुरे (सिडको, औरंगाबाद) या नावाचे ओळखपत्र प्राप्त केले. या ओळखपत्रावर त्याने स्वत:चे छायाचित्र लावले. या ओळखपत्राची छायांकित प्रती त्याने हॉटेल व्यवस्थापकाला दिल्या. या छायांकित प्रतीवरूनच त्याला हॉटेलची रूम देण्यात आली. त्यामुळे व्यवस्थापकाला पोलिसांनी चांगलेच फैलावरही घेतले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

असा झाला पर्दाफाश
धनराज आज कर्ज देण्याची योजना सांगण्यासाठी शिवसेना वसाहत परिसरात पोहोचला. त्याने महिला आणि पुरुषांना योजना सांगितली. मात्र, काहींना संशय आला. त्यांनी त्याची उलटतपासणी केली. त्यात त्याचे पितळ उघडे पडले. त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आणि पुरुषांनी त्याला जुने शहर पोलिस ठाण्यातच आणले.

दृष्टिक्षेप फसवणुकीवर
धनराज पाटील हा तोतया स्टेट बँक अधिकारी म्हणून मलकापूर परिसरात गेला. त्याने महिला व पुरुषांना सूक्ष्म लघुद्योग योजनेंतर्गत 25 हजार रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्ज मिळण्यासाठी 560 रुपये शुल्क द्यावे लागेल, असेही त्याने सांगितले. त्याने 21 महिला-पुरुषांकडून हे शुल्कही वसूल केले.