आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शालेय पोषण आहारात गैरव्यवहार; मुख्याध्यापकावर कारवाईस टाळाटाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पोषण आहारात गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई करण्यास शिक्षणाधिकार्‍यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. या गैरव्यवहार प्रकरणात हेतुपुरस्सर शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शंकर कडू यांनी 14 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

अकोला तालुक्यातील कट्यार येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीत गैरव्यवहार होत असल्याबाबतची तक्रार तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य वासुदेव शंकरराव डाबेराव यांनी 4 जानेवारी 2012 रोजी केली होती. यानंतर 6 जानेवारी रोजी शालेय पोषण आहाराच्या अधीक्षकांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.

चौकशीत आढळलेला प्रकार त्यांनी शिक्षणाधिकार्‍यांना सादर केला. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक प्र. शि. मुलांडे यांना पाककृतीचे वेळापत्रक माहिती नाही, शिजलेला अन्नाचा नमुना ठेवला जात नाही, चालू सत्रामध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत नाही, उसळ आणि भात वेगवेगळा शिजवून देण्याचे आदेश असतानाही उसळ व भात एकत्र शिजवून देण्यात येतो, पिवळा भात देण्यात येतो, नोंदवहीत नोंदीपेक्षा जवळपास 3.20 क्विंटल तांदूळ अतिरिक्त आढळून आला आहे. अशाप्रकारच्या नोंदी लेखी कळवण्यात आल्या. अहवाल सादर करून आज जवळपास एक वर्ष एक महिन्याचा कालावधी उलटला असला, त्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात आलेली नाही.

उपोषणाचा इशारा : याप्रकरणी शुक्रवारी कट्यार येथील सुभाष शंकर कडू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

फाइल वरिष्ठांच्या दालनात
या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. वरिष्ठांच्या दालनात प्रकरणाची फाइल पडून आहे. विजयकुमार वणवे, उपशिक्षणाधिकारी, (प्राथमिक विभाग) जिल्हा परिषद अकोला.