आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पोलिसांमध्ये झाली फ्रीस्टाइल, एका पोलिसावर शस्त्राने वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एका लग्नामध्ये किरकोळ वादातून अमरावती पोलिस आणि यवतमाळच्या पोलिसांमध्ये फ्रीस्टाइल झाली. यवतमाळ येथे कार्यरत असलेल्या पोलिसाने अमरावती शहर पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाला.

ही घटना तुकाराम चौकातील गणेशकृपा मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. न्यू खेताननगरात राहणारा शरद प्रकाश जाधव अमरावतीमधील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल आहे.
एका नातेवाइकाचे लग्न असल्यामुळे जाधव रविवारी सुटीवर अकोल्यात लग्नाला आला होता. त्याच लग्नात दक्षता पोलिस क्वॉर्टरमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि यवतमाळ पोलिस दलात कार्यरत बंटी खडसे आला होता. या वेळी बंटी खडसेने शरद जाधवची दुचाकी बाहेर नेली होती. दुचाकी उशिराने आणल्याने जाधवने विचारणा केली असता त्या दोघांमध्ये वाद झाला. या वेळी दोघेही तर्र होते. बंटीने शरद जाधवला मंगल कार्यालयातच मारहाण केली. त्यानंतर जाधवच्या हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार केले. जाधवचा हात रक्तबंबाळ झाला. त्याच अवस्थेत जाधवने खदान पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यावर दोन्ही पोलिस असल्याने पोलिसांनी डोक्यालाच हात लावले. याप्रकरणी जाधवची तक्रार पोलिसांनी घेतली. बंटी खडसेचा शोध घेण्यासाठी रात्री खदान पोलिस दक्षता कॉलनीत गेले होते.
पोलिस असल्याचे सांगितल्यावरही मारले
- मंगल कार्यालयात गादीखाली मी गाडीची किल्ली शोधत होतो. तेवढ्यात बंटी खडसे आणि त्याच्या एका साथीदाराने मला मारहाण केली. त्यानंतर मारत-मारत भांडे असलेल्या खोलीत नेले. मीसुद्धा पोलिस असल्याचे त्याला सांगून विनंती करत होतो. मात्र, त्याने काहीही ऐकले नाही.''
शरद जाधव, पोलिस कर्मचारी
बातम्या आणखी आहेत...