आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर निधी खर्च करायचा नसेल तर घरीच बसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अकोला विभागातील पीक कर्जाची माहिती देताना एसडीओ प्रा. खडसे.)
अकोला - शासनाकडून दरवर्षी जिल्हा वार्षिक नियोजनातून दिला जाणारा निधी खर्च केल्या जात नाही. विकासकामे तर होतच नाही, शिवाय बराचसा निधी अखर्चित राहतो. यापुढे प्रत्येक विभागाने आर्थिक वर्षातील काम करून निधी खर्च करावा. काम करता निधी परत करणा-या विभागातील अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे आदेश कामगार विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव बलदेवसिंग यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित कामांचा, खरीप हंगामाचा आणि जिल्हा वार्षिक नियोजन आढावा २५ जून रोजी घेण्यात आला. बैठकीत पालक सचिवांनी अधिका- यांना सूचना केल्या. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
महामार्ग क्रमांक-६ च्या विस्तारी करणासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील ५० हेक्टर जमीन लागणार असून, त्यातील २५ हेक्टर जमीन अधिग्रहित केली असून, उर्वरित जमिनीची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. महामार्गासाठी जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याचा मोबादला दिला जात आहे.
४९हजार स्वच्छतागृहाचे नियोजन
जिल्हापरिषदेच्या वतीने जिल्ह्यात ४९ हजार स्वच्छतागृहे बांधण्याचे नियोजन केले आहे. जुलै रोजी शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेशाचा दिवस सर्वत्र राबवला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी या वेळी सांगितले.

वीज मिळत नाही
बाळापूरग्रामीण रुग्णालयाचे संपूर्ण बांधकाम झाले असतानाही त्या ठिकाणी वीज दिली जात नाही. त्यामुळे रुग्णालय सुरू करता येत नाही. या तक्रारीवरून पालक सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांसह शासनाकडे पाठवला असून, तो थोड्याच दिवसांत केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

...तर फौजदारी कारवाई
शेतकऱ्यालापीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास अशा बँक अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलले जातील. जे बँक अधिकारी कर्जवाटपात टाळाटाळ करतील त्यांच्याविरुध्द फौजदारी दाखल करा, असे निर्देश पालक सचिवांनी दिले.
आतापर्यंत २२ टक्के पाऊस
जिल्ह्यात३० टक्के पेरण्या झाल्या असून, कपाशीची लागवड २० मेनंतर सुरू केली आहे. अाजपर्यंत १०८ मिमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या २२ टक्के पाऊस झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...