आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajanan Maharaj Festival News In Marathi, Festival Celebration At Akola, Divya Marathi,

‘गण गण गणांत बोते’चा गजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन महोत्सवानिमित्त अकोल्यात सर्वत्र गण गण गणांत बोतेचा गजर दिसून आला.

शनिवार, 22 फेब्रुवारीला 136 व्या प्रकटदिनी शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. ‘जिकडे पहावे तिकडे तु दिसशी नयना’ असा प्रत्यानुभव अकोलेकरांनी घेतला. शहरातील गजानन महाराज मंदिरांसह चौका-चौकांमध्ये लावलेल्या महाराजांच्या प्रतिमांच्या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाप्रसादासाठी येथे रांगा लागल्या होत्या. संत गजानन महाराजांचा अकोल्यात मोठा भक्तगण असून, त्यात आणि शहरातील गजानन मंदिरांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

देशमुखफैलातील संत गजानन महाराज मंदिरातर्फे परिसरात शनिवारी काढलेल्या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग घेतला.

  • ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण
  • चौकाचौकात रेखाटल्या रांगोळ्या
  • श्रीच्या मिरवणुकीत भाविकांचा जल्लोष
  • काल्याच्या कीर्तनास भाविकांची हजेरी