आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेक बाउंस, गजानन महाराज जिनिंगच्या दोन भागीदारांना कारावासाची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी न्यायालयाने गजानन महाराज जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीच्या दोन भागीदारांना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवा लक्ष्मण देशमुख आणि समीर रामभाऊ धोत्रे ही शिक्षा झालेल्या भागीदारांची नावे आहेत. धनादेश अनादरित झाल्याने अर्जदार हरिदास मारुती मिसुरकार यांनी भागीदारांविरुद्ध प्रथम र्शेणी न्यायदंडाधिकारी के. के. शहा यांच्या न्यायालयात धाव घेतली. दोन्ही भागीदारांना चार महिने कारावास, दीड लाख भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही भरपाई सहा किस्तीत द्यावी लागणार आहे. भरपाई न दिल्यास भागीदारांना प्रती किस्त 20 दिवसांची शिक्षा भोगावी लागणार आहे. अर्जदाराकडून अँड. रितेश जैन यांनी युक्तिवाद केला. भागीदारांची बाजू अँड. शिराळे यांनी मांडली.

काय घडले होते...
गजानन महाराज जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीच्या भागीदारांना हरिदास मिसुरकार यांनी हातउसने म्हणून 2009 मध्ये एक लाख 25 हजार रुपये दिले होते. फॅक्टरीच्या दोन भागीदारांनी मिसुरकर यांना या रकमेचा धनादेश दिला होता. मिसुरकर यांनी धनादेश बँकेत जमा केला. मात्र, धनादेश अनादरित (बाउंस) झाला. त्यामुळे मिसुरकर यांनी न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली होती.