आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री गजानन महाराजांचे चरित्र ‘ई कॉमिक्स’वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - श्री गजानन महाराजांच्या चरित्राचे ‘ई कॉमिक्स अँड्राइड अॅप्लिकेशन’ भुसावळातील धीरज नवलखे यांनी तयार केले आहे. ते जगभरातील श्रींच्या भक्तांसाठी गुगल प्ले आणि न्यूजहंटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथातील ओव्या त्यांनी चित्रांसह उपलब्ध करून दिल्या आहेत.

शेगावच्या श्री गजानन महाराजांचे भक्त जगभरात आहेत. या भक्तांना भुसावळातील धीरज नवलखे यांनी अँड्राइड अॅप्लिकेशन तयार करून गजानन महाराज चित्ररुप दर्शन हे २५ कथांचे कॉमिक्स तयार केले आहे. संतकवी दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ तयार केला आहे. याच ग्रंथाच्या आधारे नवलखे यांनी चित्ररुप दर्शन साकारले आहे. २१ अध्यायांच्या ग्रंथाच्या ओव्यांचा आधार घेऊन चित्र आणि संवादातून श्रींच्या लीला भक्तांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायांतील २५ कथा यात असून महाराजांचा प्रगट दिन, कोरड्या ओढ्याला पाणी आणले, तीर्थाने जानराव देशमुखास बरे केले, उन्मत्त विठोबास धडा शिकवला, अग्नीविना चिलिम पेटवली, उतरंडीचे कान्हवले, कोरड्या विहिरीस पाणी, कणसे आणि मधमाशा, हरी पाटलाशी कुस्ती, महाराज आणि गोसावी, घोड्यास वठणीवर आणले, गाय गरीब झाली, लक्ष्मण घुडेची पोटदुखी, गणू जवरे आणि सुरुंग, वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली, महारोग्याला बरे केले, पंुडलिकाची वारी, नर्मदा नदीचे दर्शन, बंडू तात्या आणि महाराज, कवर पुत्राची कांदा भाकरी, बापू काळेंना विठ्ठल दर्शन, जोंधळे, महाराजांचे निर्वाण आणि गोसाव्याच्या रुपाने दर्शन आदी कथा ई-कॉमिक्समध्ये आहेत.

हे तर माझे भाग्यच

^दासगणू महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाच्या मूळ कथा ओवीबद्ध आहेत. हीच कथा मी शब्द आणि चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला. श्रींनी हे कार्य माझ्या हातून करून घेतले हे माझे भाग्यच आहे. कॉमिक्समधील चित्रे स्वत: रेखाटली आहेत. बॅकग्राउंड तयार करण्यासाठी प्रवीण आटोळे या मित्राचीही मदत झाली. धीरजनवलखे, निर्माता, श्री गजानन महाराज चित्रदर्शन अॅप्लिकेशन