आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंच्या साक्षीने ‘श्री’चा समाधी सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्याच्या प्रसंगाला मंगळवारी 103 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झाले होते.

ऋषिपंचमीच्या पर्वावर ‘श्री’च्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविकांनी ‘श्री’च्या समाधीचे दर्शन घेतले. संत गजानन महाराजांचा जयजयकार व गण गण गणात बोतेच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. ‘श्री’चा जयजयकार आणि पालखी सोहळ्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले.

उत्सवानिमित्त 6 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या श्रीगणेश याग व श्री वरुण यागाची मंगळवारी सकाळी 10 वाजता पूर्णाहुती करण्यात आली. यानिमित्त अवभृतस्नान झाले. दुपारी 2 वाजता ‘श्री’चा पालखी रथ, मेणा, गज, अश्व, टाळकरी, पताकाधारी वारकरी यांच्यासह नगर परिक्रमेसाठी निघाली. संस्थानमधून निघालेली पालखी दत्त मंदिर, मोटे यांचे महादेव मंदिर, प्रगटस्थळ, सीतला माता मंदिर पश्चिमद्वार, उर्वरित. पान 12

पावसातही उत्साह कायम
दुपारी 2 वाजता पालखी नगर परिक्रमेसाठी निघताना पावसानेही जोरदार हजेरी लावली. मात्र, भाविकांचा उत्साह कायमच राहिला.

आज उत्सवाची होणार सांगता
सकाळी 11 वाजता काल्याचे कीर्तन व दहीहंडीनंतर उत्सवाची सांगता होईल. सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान काल्याचे कीर्तन होईल.