आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्डा मारहाण प्रकरण : पोलिस हल्ला करण्यासाठी गेले नव्हते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कापसी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला १०० ते १२५ जुगारींनी लक्ष करत त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी १० पोलिस जखमी झाले आहेत.
त्यापैकी तिघे गंभीर आहेत, तर पोलिसांनी निरपराध गावकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आपण सखोल चौकशी करणार असून, त्यात जर पोलिस दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी दिली. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार खेळण्याची परंपरा आहे. त्याअनुषंगाने कापशी येथे ८० लोक जुगार खेळत असल्याची माहिती मला मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वात १८ पोलिस कर्मचाऱ्यांनी कापशी येथे छापा टाकला. या वेळी जुगार खेळताना नागरिक दिसून आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी तेथील जुगारींनी पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला चढवला. त्यात १० पोलिस जखमी झाले. त्यापैकी चंद्रकांत नागपुरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मयूर अरुण निखाडे आणि सुदाम लक्ष्मणराव धुडगुंडे हे तीन पोलिस गंभीर आहेत, तर प्रशांत बागल, सुमीत गोरे, शेखर कोद्रे, अमोल भाकडे, चंद्रकांत चिकटे, अमोल देठे, ज्योतीराव भोजने, गणेश महाले, भागवत शेवाळे, परमेश्वर तितरे, रवींद्र तेलगोटे, विकास वाघ हे पोलिस कर्मचारी दगडफेकीत किरकोळ जखमी झाले आहेत.
काही कर्मचारी परत आल्यानंतर गंभीर जखमी कर्मचारी कापशी येथेच मागे राहिले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमक तेथे पाठवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तेथील आबालवृद्धांना मारहाण केल्याचे आरोप होत आहेत. पण, तसे काहीही झाले नाही. जर पोलिसांनी अतिरेक केला असेल, तर नागरिकांनी पुढे यावे आणि तशी तक्रार करावी. पोलिस जर दोषी असतील, तर आपण त्यांच्यावर निश्चितच कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. याप्रकरणी आठ नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.