अकोला- गणेशिवसर्जनामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी पोलिस विभागाने दक्षता घेतली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जिल्ह्याबाहेरून मिळालेले पोलिस तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यासाठी यंदा वरिष्ठ पोलिस अधिका-यांव्यतिरिक्त १६५४ पोलिस जवान परिस्थितीवर नजर ठेवून राहणार आहेत.
शनिवारी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, सहायक पोलिस अधीक्षक शहर डॉ. प्रवीण मुंढे, सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली आणि बंदोबस्ताविषयी परिस्थिती जाणून घेतली. सप्टेंबर रोजी गणेश िवसर्जन होणार असल्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताचे नियोजन केले. यासाठी बाहेरून एक एसआरपीएफ कंपनी, एक सीआरपीएफ कंपनी, पाच पोलिस उपअधीक्षक, १५ परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक, १५० पोलिस कर्मचारी, ४७७ होमगार्ड पुरुष, ९१ महिला होमगार्ड प्राप्त झाले आहेत. तसेच अकोला पोलिस दलातील पाच पोलिस उपअधीक्षक, २४ पोलिस निरीक्षक, ७८ सपोनि, २५ पोलिस उपनिरीक्षक १६५४ पोलिस कर्मचा-यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली. सात फिक्स पॉइंटही लावण्यात आले आहेत.