आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Utsav 2013 Akola Mahavitaran Special Electricity For Pandal

अनधिकृत वीज जोडणीवर साजरा होऊ नये गणोशोत्सव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी..’ गणरायाला असे साकडे घालणारी 90 टक्के गणेशोत्सव मंडळे आपल्या माथी अनधिकृत वीज जोडणीचा वापर करत असतात. गेल्या काही वर्षांपासून महावितरणने अत्यल्प दरात वीज देण्याची योजना जाहीर केली असतानाही उत्सवासाठी अनधिकृत वीज जोडणी घेण्यात या मंडळांना धन्यता वाटत आहे. गेल्या वर्षी 477 नोंदणीकृत मंडळांपैकी केवळ 38 मंडळांनीच अधिकृत वीजपुरवठा घेतला होता. अनधिकृत वीजपुरवठय़ाऐवजी अधिकृत वीजपुरवठा घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका गणेश मंडळांनी घेण्याची गरज आहे.

सामाजिक एकतेसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला. मात्र, आता गणेशोत्सवाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात व्यापक फेरबदल झाले आहेत. मोठय़ा गणेशोत्सव मंडळांकडे लाखो रुपयांची वर्गणी गोळा होत असताना महावितरणकडून अधिकृत वीजपुरवठा घेण्यास टाळाटाळ करण्यात येते. असा अनुभव गेल्या काही वर्षांमध्ये आला. गेल्या वर्षी महावितरणच्या कर्मचार्‍यांनीच गणेशोत्सव मंडळांकडे जाण्यास सुरुवात केली असली तरी शहरात अधिकृतरीत्या 38 मंडळांनीच वीज मीटर घेतले होते. शहरासह जिल्हय़ात एकूण 1,767 गणेश मूर्तींची स्थापना झालेली होती, तशी नोंद पोलिसांनी घेतली होती. शहरातील 664 तर ग्रामीण भागातील 1,103 मंडळांचा यामध्ये समावेश आहे. एक गाव एक गणपती योजनेत 309 मंडळे सहभागी झाली आहेत. सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात मात्र जिल्ह्यातील 477 सार्वजनिक गणोश मंडळांची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ 38 मंडळांनीच अधिकृत वीज मीटर घेतल्याने इतर मंडळांनी अनधिकृत किंवा घरगुती ग्राहकांकडून घेतलेल्या विजेतूनच गणेशोत्सव साजरा केल्याचे धक्क ादायक वास्तव समोर आले आहे.इतक्या मोठय़ा प्रमाणावर होणार्‍या उत्सवातील सजावट आणि रोषणाईसाठी सर्रास अनधिकृत वीज वापरली जाते; त्यास आळा बसावा यासाठी या उत्सवात स्वस्त दरात वीज देण्याची घोषणा महावितरणने केली. समाजप्रबोधनासाठी सार्वजनिक गणोशोत्सव साजरे करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, महाराष्ट्र विजेच्या तुटवड्यामुळे होरपळून निघत असताना अनधिकृत वीज जोडणी घेणारी ही मंडळे समाजापुढे कोणता आदर्श निर्माण करत आहेत, असा प्र्श उपस्थित केला जात आहे.

अग्रीम रक्कम भरल्यानंतर तातडीने महावितरणकडून मीटर दिले जाते. मंडळांनी वापरलेल्या विजेचे बिल त्यातून कापून उरलेले पैसे या मंडळाला परत केले जातात. अनधिकृत वीज जोडणी घेताना सुरक्षेचे सारे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे शॉर्ट सर्किटने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे अनधिकृत वीज न वापरता विजेचे अधिकृत मीटर घेण्याची खरी गरज आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाचा करा उपयोग

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी महावितरणच्या वतीने ऑनलाइन वीज जोडणीही देण्यात येणार आहे. मंडळांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी एकाद्या घरातून वीज जोडणी घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम त्या घरातील विद्युत उपकरणांवर पडू शकतो. घरात सिंगल फेजवर 220-240 व्हॅटच्या दरम्यान वीजपुरवठा होतो. जास्त वीज ओढल्यास इतर उपकरणे जळण्याची भीती असते. त्यामुळे घरातून वीजपुरवठा घेणे टाळणे आवश्यक आहे.


वीज गळती वाढेल
गणेशोत्सव अनधिकृत विजेवर साजरा झाल्यास महावितरणच्या वीज गळतीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे महावितरण त्या फिडर्सवर भारनियमन करण्याचा निर्णय घेऊ शकते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसू शकतो. उत्सव साजरा करताना चोरीची वीज वापरल्यास अप्रत्यक्षपणे भारनियमनाला आमंत्रण दिले जाते.

मंडळांनी सामाजिक जबाबदारी निभवावी
अधिकृत वीजपुरवठा घेऊन गणेश मंडळांनी महावितरणला सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणकडून पूर्ण प्रय} करण्यात येत आहेत. गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेऊन सामाजिक जबाबदारी निभवावी. एस. एस. धांडे, मुख्य अभियंता, अमरावती परिमंडळ, महावितरण, अकोला.

अधिकृत वीजपुरवठय़ाचे मंडळांना फायदे काय?
3.27 पैसे या कमी दराने पुरवठा
योग्य दाबाने वीजपुरवठा
अधिकृत वीज
अपघातावर आळा बसेल
सामाजिक संदेश देता येईल
सुरक्षित वातावरण राहील

अनधिकृत वीज जोडणी मनपाच्या खांबावरून
गणोशोत्सवात अनेक मंडळांकडून अनधिकृत वीज जोडणी घेण्यात येत असल्याची बाब वीज कंपनीच्या पाहणीत उघड झाली आहे. यातील बहुतांश अनधिकृत वीज जोडणी या मनपाच्या विद्युत खांबांवरून होत असल्याने आपले घेणे देणे नसल्याची भूमिका घेत कंपनीने हात झटकले आहेत. दुसरीकडे घरातून, दुकानातून अनधिकृत वीज जोडणी घेणार्‍या मंडळांवर कारवाईबाबत कंपनीने गांभीर्य दाखवले नाही. यासंदर्भात मनपाचीही उदासीन भूमिका आहे. पथदिव्यांवरुन अनधिकृत वीज जोडणी घेत असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या मुद्यावर कारवाईसंदर्भात महावितरण, मनपात टोलवाटोलवी केली जाते.