आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरात युवतीवर गँगरेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - बुलडाणा कारागृहामध्ये मावशीला भेटण्यासाठी मावशासह आलेल्या एका 22 वर्षीय युवतीवर मलकापूर येथील चार ऑटोचालकांनी मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास नांदुरा मार्गावरील एका हॉटेलच्या मागे गँगरेप केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.1) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, मलकापूर न्यायालयाने चारही आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बलात्कारप्रकरणी मलकापूर पोलिसांनी अॉटोचालक सतीश वासुदेव दाणे (24, रा. मातामहाकालीनगर), रवींद्र पांडुरंग कवळकर (28, रा. हनुमाननगर), शरद शालीग्राम पाटील (28, रा. गणवाडी आणि दिलीप प्रल्हाद उंबरकर (रा. संत ज्ञानेश्वरनगर) या चौघांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मलकापूर शहर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे ऑटोचालक असल्याची माहिती समोर येत आहे. पीडित युवती ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ठिकाणची रहिवासी आहे. सध्या वसईतील ताळकेनगरमध्ये ही युवती राहत होती. लोणार येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये सध्या बुलडाणा जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या तिच्या मावशीला भेटण्यासाठी ती तिच्या मावशासोबतच बुलडाणा येथे एक जुलैला आली होती.
सायंकाळी सहा वाजता बुलडाणा येथून मुंबईला जाण्यासाठी रात्री आठ वाजता ते मलकापूर बसस्थानकावर पोहोचले. तेथे ते मुंबईला जाणार्‍या गाडीची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, रात्री बसस्थानकावरील ऑटोचालक सतीश वासुदेव दाणे, रवींद्र कवळकर, शरद शालीग्राम पाटील हे तिघे बसस्थानकावर त्यांना भेटले. सोबतच मुंबईला जाण्यासाठी आता रेल्वे असल्याने तुम्हाला मुंबईला सोडतो, असे सांगून त्यांना तिघांनीही ऑटोमध्ये बसवले. मात्र, विनानंबरचा हा ऑटो रेल्वे स्टेशनकडे न नेता त्यांनी दुसर्‍या दिशेने नेला. ही बाब मुलीचे मावशे व मुलीच्या लक्षात येताच त्यांनी ऑटोमधून खाली उड्या मारल्या. दरम्यान, सतीश दाणे आणि रवींद्र कवळकार यांनी युवतीला उडी मारत असतानाच ऑटोत पकडून ठेवले. सोबतच त्या युवतीस नांदुरा रोडवरील मुकुंदनगर परिसरातील हॉटेल सूर्याच्या पाठीमागील बाजूस नेऊन तेथे बलात्कार केला. यानंतर दिलीप प्रल्हाद उंबरकर हा घटनास्थळी ऑटो एमएच-28-टी-704 द्वारे पोहोचला व युवतीचा शोध घेऊ लागला. मात्र, भीतीमुळे ती लपून बसल्याने त्याला सापडली नाही.

घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार
हा प्रकार विठ्ठल नरहरी महाले यांनी पाहिल्याने त्यांनी पीडित युवतीच्या मावशाला सोबत घेऊन घटनेची माहिती मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पीडित युवतीचा शोध घेऊन तिच्या तक्रारीनुसार, रात्रीच चारही आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेची प्रकृती स्थिर
या प्रकरणातील पीडित युवतीची प्रकृती स्थिर आहे. तिला गंभीर इजा झालेली नाही. सध्या डॉक्टरांचा संप सुरू असल्याने मलकापूरमध्ये पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी तथा उपचार करता आले नाही. त्यामुळे या युवतीला अकोला येथे हलवण्यात आले असून, तिची अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमध्ये युवतीला मोठी इजा झालेली नाही.
पीडित युवतीची मावशी बुलडाणा जिल्हा कारागृहात
लोणार तालुक्यातील एका खुनाच्या प्रकरणामध्ये मुंबईमधील या पीडित युवतीची मावशी सध्या बुलडाणा कारागृहामध्ये आहे. एक जुलै रोजी न्यायालयात या मावशीची तारीख असल्याने तिला भेटून मुंबईला परत जाताना पीडित युवतीवर हा अत्याचार झाला,अशी आपबीती या युवतीने पोलिसांसमोर कथन केली. या घटनेचा शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
मलकापूर येथे मंगळवारी रात्री एका युवतीवर बलात्कार करणा-या आरोपींना मलकापूर पोलिसांनी अटक केली.
आरोपीमध्ये होमगार्डचा समावेश?
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींपैकी एक आरोपी हा काही दिवस गृहरक्षक दलात कार्यरत असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. होमगार्डच्या रेकॉर्डवरील कर्मचार्‍याच्या नावाशी त्यातील एका व्यक्तीच्या नावाचे साधम्र्य असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर येत आहे.
चौघांनाही ठोठावली पोलिस कोठडी
अटक केलेल्या चारही ऑटोचालकांना मलकापूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता मलकापूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी जी. र्शीधर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पीडित युवतीवर सध्या अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे