आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी शहरातून ४४ किलो गांजा केला जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीमध्ये लपवून ठेवलेला गांजा गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. हा गांजा ४३ किलो ६४० ग्रॅम असून, त्याची बाजारभावानुसार त दोन लाख ६१ हजार रुपये आहे. तर मोठ्या कारवाया करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेने मात्र याच भागातून ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

रेल्वेस्थानक परिसरामध्ये सायकल स्टोअर्सचे दुकान असलेल्या सचनि लक्ष्मण कनोिजया हा गांजाची तस्करी करतो. त्याच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये गांजा साठवून ठेवला आहे, अशी माहिती खबर्‍याने रामदासपेठ पोलिसांना दिली. त्या माहितीवरून पोलिसांनी गड्डम प्लॉटमधील त्याच्या घरी छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली, मात्र घरात गांजा आढळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराच्या गच्चीवर असलेल्या ितन्ही पाण्याच्या टाक्यांमध्ये बघितले असता एका टाकीमध्ये गांजा दिसून आला. पोलिसांनी ४३ किलो ६४० ग्रॅम गांजा ताब्यात घेतला व सचनि कनोिजया याला अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम २० ब, २२ एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुधाकर देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, पोलिस उपनिरीक्षक प्रणिती लांजेवार, पांडे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश वाघ, गणेश अवचार, इक्बाल पटेल, गणेश पांडे, संजय कडू, दनिकर धुरंधर, रवी इचे, जय मंडावरे, गीता अवचार यांनी केली.
एसीबीने पकडला ४०० ग्रॅम गांजा
स्थानिक गुन्हे शाखा संपूर्ण जिल्हाभर कारवाया करू शकते. अनेक दविसांपासून या शाखेने एकही मोठी कारवाई केली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये विविध पोलिस ठाण्यांतर्गत किरकोळ कारवाया केल्या आहेत. जुगार अड्ड्यावर धाडी टाकून हजार बाराशे रुपयांच्या मुद्देमालापलीकडे करवाया केल्या नाहीत. रामदासपेठ ठाण्यांतर्गत ४०० ग्रॅम गांजा पकडून त्यांनी आपली कामगिरी दाखवून दिली आहे.
यापूर्वीही आरोपीकडे पकडला होता गांजा
सचनि कनोिजया याच्या घरून पोलिसांनी या आधीही छापा टाकून १७ किलाे गांजा जप्त केला होता. तेव्हासुद्धा त्याच्यावर कारवाई झाली होती. आजही त्याच्या घरून पोलिसांनी गांजा पकडला आहे.
उत्सवानिमित्त साठा
कावड उत्सवानिमित्त आरोपीने गांजा साठवला. याबाबतची अिधक माहिती देऊन सहकार्य करावे.''
सुधाकर देशमुख, ठाणेदार