आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात साडेतीन लाखांचा गांजा केला जप्त; ओडिशा ‘कनेक्शन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बेवारस आढळून आलेल्या चार बॅग्स्मध्ये 70 किलो गांजा असल्याचे 4 ऑगस्टला उजेडात आले. जप्त केलेल्या गांजाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. या बॅग्स् अकोल्याच्या रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्या होत्या.

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील बोगी नंबर एस-2 मध्ये चार बेवारस बॅग्स असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने येथील जीआरपीच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांना दिली. जीआरपीने फलाट क्रमांक 1 वर धाव घेत चार बॅग्स् ताब्यात घेतल्या. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी 4 ऑगस्टला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई जीआरपीचे ठाणेदार डी. बी. सरक, उपनिरीक्षक के. पी. तायडे, दिलीप बारंगे, मनोहर अंभोरे, गौतम शिरसाट, कपिल गवई, इरफान पठाण, प्रकाश डोंगरदिवे यांनी केली.

नजर मूळ घटनेवर.
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस शनिवारी बडनेरा स्थानकानजीक चैन ओढून थांबवण्यात आली होती. चार जण बॅग्स् घेऊन शेताकडे जाण्यास निघाले. याच गाडीतून प्रवास करणारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायलेंसह प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशांच्या दिशेने दगडफेक केली. प्रवाशांनी दगडफेक करीत त्यांचा पाठलाग केला. त्यांनी बॅग्स् सोडून पळ काढला होता. त्यानंतर या बॅग्स्बाबत प्रशासनाला माहिती दिली होती.

बडनेरा रेल्वेस्थानकाजवळ पकडण्यात आलेला गांजा अमरावती जिल्ह्यात वितरित करण्यात येणार होता. यापूर्वीही अमरावती जिल्ह्यात पकडण्यात आलेला गांजा हा ओडिशा आणि आंध्र प्रदेशातून आला होता. दरम्यान जीआरपीने सध्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बॅगमधून गांजा कोणत्या तस्कारासाठी आणण्यात आला, कोणातर्फे वितरित करण्यात येणार या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

आरोपींचा शोध सुरू
पकडण्यात आलेल्या बॅगमधील गांजा ओला आहे. निव्वळ गांजाचे वजन 70 किलो आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
-डी. बी. सरक, ठाणेदार, जीआरपी

आरोपींचा शोध घेणे गरजेचे
चार मोठय़ा बॅग्स्मध्ये मोठय़ा प्रमाणात गांजा जप्त करण्यात होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेणे आवश्यक आहे.
-पंकज जायले, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड.