आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात शहरात सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात सिलिंडरची कृत्रिम टंचाई भासत आहे. पैसे देऊनही नागरिकांना दिवस दिवसभर सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर अवैधरीत्या सिलिंडरची विक्री होत असल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे. यावर नियत्रंण ठेवणारा जिल्हा पुरवठा विभाग मात्र, याबाबत अनभिज्ञ आहे.

शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन सिलिंडर बुकिंग सुरू झाल्यानंतर शहरात सिलिंडरसाठी नागरिकांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. आपले कामे बाजूला ठेवून त्यांना संबंधित गॅस पुरवठा संचालकाकडे दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरात सिलिंडरसाठी हाणामारी झाल्याची घटना घडल्या आहेत. पोलिस संरक्षणात गॅस पुरवठा संचालकांना सिलिंडरची विक्री करावी लागत होती. या प्रकाराला संबंधित संचालक दोषी असल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या शहरात अवैधरीत्या सिलिंडरची विक्री होत आहे. 460 रुपयांना मिळणारे सिलिंडर अवैधरीत्या 600 ते 700 रुपयांना विकल्या जात आहे. जे नागरिक सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग करतात मात्र त्यांना सिलिंडरसाठी वाट बघावी लागत आहे. मात्र, व्यावसायिकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन त्यांना सिलिंडर देण्यात येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाइन बुकिंगमुळे नागरिकांना दिलासा
शासनाने शहरातील विविध गॅस वितरकांकडे ऑनलाइन बुकिंग केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.