आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तीत गोदाम; अकोलेकरांचा जीव धोक्यात, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मागील अनेक वर्षांपासून गॅसचे गोदाम आहेत. लोकवस्तीत हे गॅस गोदाम असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्देवी घटना होण्याची दाट शक्यता आहे. ही घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील कित्येक वर्षांपासून शहराच्या मध्यवस्तीत तीन ते चार गॅस गोदाम आहे. नियमित या परिसरात घरगुती गॅस ने- आण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी राहते. गॅससारख्या स्फोटक व अत्यंत ज्वलनशील पदार्थांमुळे शहरातील गॅस गोदाम लोकवस्तीच्या बाहेर असणे आवश्यक आहे. याबाबत काही नागरिकांना गॅस गोदामामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. एखद्यावेळी गॅस लिक झाल्यास किंवा घरातील विद्युत सुरू राहल्यास स्फोट होण्याची दाट शक्यता आहे. सण उत्सव किंवा लग्न समारंभ असल्यास स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर गॅस गोदाम शहराच्या बाहेर नेण्याची मागणी होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरातील ज्योतीनगर, दूध डेअरी मार्गावरील ताथोड मंगल कार्यालयासमोर, कृषिनगर परिसरात गॅस गोदाम आहेत.

प्रशासनाला पत्र देणार
अकोला शहरात गॅस गोदाम आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत महापालिकेच्या फायर विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यामुळे एखादी भविष्यात घटना होणार नाही. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून यावर रीतसर कारवाई करण्यात येईल.
-दीपक चौधरी, आयुक्त महापालिका, अकोला.

गोदाम पूर्वीचेच आहे
शहरातील असलेले गॅस गोदाम पूर्वीचेच आहेत. नवीन गॅस गोदामाला परवानगी देताना खबरदारी घेण्यात येत आहे. जीवित्त व वित्त हानी होणार नाही, यासाठी गॅस गोदाम शहराबाहेर असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
-सोहम वायाळ, उपविभागीय महसूल अधिकारी, अकोला