आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यातील ग्राहकांना गॅस दरवाढीचा चटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दिवसेंदिवस होत असलेल्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, घरगुती गॅस सिलिंडर 455 रुपये, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर 2,215 रुपयांमध्ये मिळणार आहे. सन 2013 मध्ये दोन वेळा गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्यानंतरही 2014 च्या पहिल्याच दिवशी गॅस कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गॅस कंपन्यांनी दरवाढ केली आहे. नव्या दरानूसार आधार कार्ड लिंक असलेल्या घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या ग्राहकाला 455 रुपयांना, तर आधार कार्ड लिंक नसलेल्या ग्राहकाला 1,305 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. आधीच अनुदान जमा होण्याचा प्रo्न असताना नव्याने झालेली दरवाढ ग्राहकांच्या माथी मारल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ झाली असल्याचे गॅस कंपन्यांचे म्हणणे असले तरी ग्राहकांच्या बजेटचा कुठलाही विचार न करता गॅस सिलिंडरचे भाव वाढवण्यासोबतच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवण्यावर भर दिलेला दिसून आला.

दरम्यान, शहर तसेच जिल्हय़ातील ग्रामीण भागात सिलिंडरची जोडणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्हय़ात प्रत्येक तालुक्यासह एकूण 23 गॅस एजंसीज कार्यान्वित असून, सर्वांनाच गॅस सिलिंडर मिळत असल्याचा दावा पुरवठा विभाग करत असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. दररोज गॅस सिलिंडरसाठी मोठमोठय़ा रांगा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. घरगुती गॅस सिलिंडरची एकीकडे मारामार असताना व्यावसायिक सिलिंडर मात्र सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.