आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोंदणीनंतरही ‘गॅस’ प्रतिक्षेच्या वाटेवरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरासह गॅस सिलिंडरची मोठय़ा प्रमाणात कृत्रिम टंचाई भासत आहे. ऑनलाइन बुकिंगनंतर पैसे देऊनही नागरिकांना दिवसभर सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर होत आहे. यामुळे सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. याकडे जिल्हा पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन सिलिंडर बुकिंग सुरू झाल्यानंतर शहरात सिलिंडरसाठी नागरिकांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. आपली कामे बाजूला ठेवून त्यांना संबंधित गॅस पुरवठा संचालकाकडे दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. गत काही दिवसांपूर्वी शहरात गॅस सिलिंडरसाठी हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिस संरक्षणात गॅसपुरवठा संचालकांना सिलिंडरची विक्री करावी लागत होती. या प्रकाराला संबंधित संचालक दोषी असल्याचा आरोप करण्यात आला होता. अवैधरित्या शहरात सिलिंडरची विक्री होत आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर काही एजन्सीत नागरिकांना सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागते. 28 जुलै 2013 पासून सिलिंडरचा शहरात प्रचंड तुटवठा होत आहे. अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 447 रुपये आहे. विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 920 रुपये आहे. सणा-सुदीचे दिवस असल्याने नागरिकांना विशेषत: महिलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.


पावसामुळे अडचण
ज्या राज्यातून सिलिंडर येतात तिथे यंत्रसामग्री खराब झाल्यामुळे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने काही ठिकाणांवरून सिलिंडर पोहोचले नाही. तसेच पावसाळा व हिवाळ्यामध्ये सिलिंडरचा अधिक वापर होत असल्याने काही प्रमाणात सिलिंडरचा तुटवठा भासत आहे.’’ विजय चोपडे, संचालक, विजय गॅस एजन्सी,


पुरवठा विभागाला निर्देश
शहर पुरवठा विभागाकडून गॅस सिलिंडरचा का तुटवडा भासत आहे, याची माहिती घेतली जाईल. नागरिकांना सिलिंडरचा पुरवठा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाला उपाययोजनेसाठी निर्देश देणार आहे.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी, अकोला