आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटातील युवकाच्या खुनाची दिली कबुली, अंजनगावात केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ताज अली)
अकोट- येथील इफ्तेखार प्लॉटमधील एका जणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची कबुली अंजनगाव येथे 8 जून रोजी बैल चोरी करताना पकडलेल्या आरोपीने पोलिसांना दिली आहे. या अपहरणासंदर्भात अकोट शहर पोलिस स्टेशनला यापूर्वीच तक्रार दिली असल्याची माहिती आहे.
रियासत अली ताहेर अली देशमुख रा. इफ्तेखार प्लाॅट अकोट यांनी आपला भाऊ ताज अली उर्फ अमान अली (वय २५) याचे संदीप सुरेश वरोकार रा. वडाळी देशमुख याने १८ मे रोजी अपहरण केले आठ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली. त्यावरून अकोट शहर पोलिसांनी संदीप वरोकारविरुद्ध भादंवि कलम ३६३,३६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अंजनगाव येथे बैल चोरीप्रकरणी पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवताच संदीपने अपहृत ताजअली उर्फ अमानअली याचा शिंधी गावानजीक एका विहिरीजवळ खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर काही दिवस पोपटखेड किल्ला परिसरात दडून राहून आपण अंजनगाव शहरात आल्याचेही त्याने सांगितले.
अंजनगाव पोलिसांनी तत्काळ याबाबत अकोट शहर पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे रियासतअली ताहेरअली यांच्या फिर्यादीवरून संदीप वरोकारविरुद्ध शहर पोलिसांत आज अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेला दुजाेरा देत जूनला सकाळी अंजनगाव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी संदीपला आणण्याकरिता पोलिसांचे एक पथक रवाना होणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रेमानंद कात्रे यांनी दिली.