आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोतवाल बुकाची नक्कल अाता एका मिनिटात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विविध दाखल्यांसाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल मिळण्यासाठीचा त्रास आता कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व कोतवाल बुकांचे रेकाॅर्ड संगणकीकृत केले आहे. त्यामुळे आता एका मिनिटात कोतवाल बुकाची नक्कल मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ पालक सचिव बलदेव सिंह जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते होत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात कोतवाल हे संबंधित गावातील कायदा सुव्यवस्था, जन्म-मृत्यू नोंदी आणि महसूल खंड वसुली करण्यासाठी जबाबदार होते. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी ह्या कोतवाल बुकात ठेवल्या जात होत्या. शासनाने व्यक्तिगत पुरावा म्हणून कोतवाल बुकाच्या नकलेला प्राधान्य दिले असून, विविध शासकीय कामांसाठी महसूल पुरावा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य समजले जाते. सध्या नागरिकांना कोतवाल बुकाची नक्कल मिळवण्यासाठी विहित नमुन्याचा अर्ज सादर केल्यानंतर त्यांना जवळपास सात ते आठ दिवसांनंतर नक्कल मिळते. याशिवाय तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या नकलेचा उर्वरितपान
शोधघेण्यासाठी व्यक्तिश: कोतवाल बुक हाताळावे लागते. यात संबंधित कर्मचारी व्यक्तीलासुद्धा त्रास होतो. त्यानंतर कोतवाल बुकाची सत्यप्रत दिली जाते. या नकलेचा प्रचलित पद्धतीने शोध घेताना नजरचुकीने किंवा अन्य काही कारणांमुळे बऱ्याच नोंदी सापडत नाहीत. शोधात बऱ्याच मर्यादा विलंब होतो. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कोतवाल बुकाचे सन २०१२ पासून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत संगणकीकरणास सुरुवात करण्यात आली होती. आज रोजी हे काम पूर्ण झाले आहे.
असे आहेत फायदे
* संगणकीकरणामुळे कोतवाल बुकात कोणीही खोडाखोड किंवा बदल करू शकत नाही.
* सहज काही मिनिटांत नागरिकांना कोतवाल बुकाची नक्कल उपलब्ध करून देता येऊ शकते.
* मनुष्यबळ लागत नाही. एकटा व्यक्ती ही सर्व प्रक्रिया करू शकतो.
* तक्रारीचे प्रमाण कमी होईल.

जिल्हा प्रशासनाने वडिलोपार्जित माहिती या दस्तऐवजांमध्ये संग्रहित केली आहे. अकोला तहसीलमध्ये आजपासून नागरिकांना संगणकीकृत कोतवाल बुकाची नक्कल मिळणार आहे.'' प्रा.संजय खडसे, एसडीओ अकोला.
अाॅनलाईनसाठी प्रयत्न
ज्याप्रमाणेसातबारा आपण ऑनलाइन स्वत: काढू शकतो, त्याच धर्तीवर प्रत्येक नागरिकाला आपली कोतवाल बुकाची नक्कल स्वत: काढता यावी हा आमचा भविष्यातील प्रकल्प आहे.'' -जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी
दृष्टिक्षेपात कोतवाल बुक
तालुका गावे बुक संख्या पाने रेकार्ड
अकोला१५८ ६०२ ६६,८५० ४,६७,९५०
बार्शिटाकळी १२३ ३७० ३७,००० १,४८,०००
बाळापूर १०३ २६८ २९,४८० २,९५,३२०
पातूर ७४ २८१ ४३,५८६ ३,००,०००
अकोट १८१ ४३६ ४१,००० ३,२८,०००
तेल्हारा १०६ ३६० १,१२,०१६ ४,४८,०६४
मूर्तिजापूर १६४ ५०१ ३५,०३० २,२४,१८०
एकूण९०९ २८१८ ३,६४,९६२ २२,११,५१४
बातम्या आणखी आहेत...