आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकन्या समृद्धी योजनेला मिळतोय अत्यल्प प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - 'समृद्धबालिका देश का भविष्य' हे ब्रीद घेऊन कार्यान्वित झालेल्या सुकन्या समृद्धी योजनेचा किमान एक हजार रुपये भरून लाभ घेता येतो. मात्र, मुलींच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये अकोला वाशीम जिल्ह्यात केवळ हजार ७०४ मुलींच्या पित्यांनी या योजनेत खाते उघडून आपल्या मुलींचे भविष्य समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्त्रीभ्रूण हत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून, मुलींचा जन्मदरही घसरला आहे. या प्रकाराने अनेक गंभीर समस्या देशासमोर उभ्या ठाकल्या. यावर उपाययोजना म्हणून केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजना कायदेही तयार करण्यात आले आहेत. परिणामी, थोडाफार बदल दिसून आला, मात्र समस्यांचा डोंगर उभाच आहे. या समस्येमुळे देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलली. "बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देत त्यांनी "समृद्ध बालिका देश का भविष्य' ओळखून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलीच्या जन्मापासून या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान हजार रुपये वार्षिक भरावे लागतात. त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत रक्कम जमा करता येते. खाते उघडल्यापासून १४ वर्षांपर्यंत खात्यात रक्कम जमा करता येते. २१ वर्षांनंतर खाते परिपक्व होते. मात्र, त्याआधी मुलीचा विवाह झाल्यास तोपर्यंतच्या व्याजात कपात करता रक्कम दिल्या जाते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ५० टक्के रक्कमसुद्धा काढता येते.

विशेष म्हणजे पोस्ट खात्याच्या इतर योजनांपेक्षा या योजनेच्या खात्यामधील रकमेला अधिक व्याजदर दिला जातो. मात्र, तरीही योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच या योजनेच्या संपूर्ण खात्यांमध्ये केवळ कोटी ४५ लाख ७०,६०० रुपये जमा झाले आहेत.

व्याजदरात वाढ : सुकन्यासमृद्धी योजनेमध्ये खाते उघडले असता पूर्वी ९.१ टक्के वार्षिक व्याजदर दिला जात होता. २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून या योजनेचा व्याजदर ९.२ टक्के केला आहे.

योजना खंडित होत नाही : कितीहीवेळा १०० रुपयांच्या पटीतील रक्कम खात्यात भरता येते. वार्षिक किमान हजार रुपये खात्यात जमा करणे आवश्यक आहे. किमान रकमेचा भरणा झाल्यास खाते खंडित होते. मात्र, नाममात्र ५० रुपये प्रतिवर्ष दंड, तोपर्यंतची रक्कम भरल्यास पुन्हा हे खाते पूर्ववत सुरू होते.

ग्रामीण खातेदार कमी
शहरी भागातील अनेक पालक आपल्या मुलींचे खाते योजनेत उघडत आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही पोस्ट कार्यालयात या योजनेची खाती उघडली जातात.किमान भरणा रक्कम, अधिक व्याजदर पाहता याचा लाभ घ्यावा '' - चंद्रकांतशुक्ला, नायब डाकपाल, अकोला.

वयोमर्यादा वाढवण्यात आली : अधिकाधिकमुलींचे भविष्य सुरक्षित होऊन, जास्तीत जास्त पालकांना आपल्या मुलींचे खाते उघडता यावे, यासाठी या सुकन्या समृद्धी योजनेची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. पूर्वी जन्मापासून १० वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या मुलींचेच खाते उघडले जात होते. या वर्षीपासून वयोमर्यादेत वाढ केली. म्हणजेच जी मुलगी डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली आहे, तिचेही खाते योजनेत उघडले जाईल.