आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वी सापडला चिमुकलीचा मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - वाढदिवसाच्या ऐन एका दिवसापूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाहण्याची वेळ आई-वडिलांवर आली. हिंगणघाट येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत चिमुकलीचे नाव रिया रवींद्र फुलझेले असे आहे. हिंगणघाटच्या महात्मा फुले वॉर्डात राहणारी दोन वर्षांची चिमुकली रिया फुलझेले बुधवारी (ता.9) दुपारी 4 वाजताच्या सुमारास खेळत असताना बेपत्ता झाली. बराच वेळ होऊनही रिया दिसत नसल्याने अज्ञाताने रियाला पळवल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली. गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या टाक्यात तिचा मृतदेह आढळला.